Thane Politics : ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समितींच्या अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला असून ४ ऑगस्ट रोजी निवडणुका पार पडणार आहे. यासाठी शुक्रवार ३१ जुलै रोजी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानुसार ९ प्रभाग समित्यांपैकी ७ प्रभाग सामित्यांवर शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व असल्याने त्यांनी ७ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजपने एका प्रभाग समितीसाठी तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मुंब्रा प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एमआयएमकडून देखील प्रभाग समितीवर दावा करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्ष नेते निवड प्रक्रिया पार पडली. यानंतर स्थायी समितीसह विविध समित्या आणि प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुका या रखडल्या होत्या. अशातच मागील आठवड्यात पालिकेच्या सचिव विभागाकडून प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकांसाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्र व्यवहार करून वेळापत्रक कळविण्याची विनंती केली.
त्यानुसार ४ ऑगस्ट रोजीची वेळ कळविण्यात आली. त्यानुसे शुक्रवार ३१ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी ९ प्रभाग समित्यांसाठी शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी शरद पवार, भाजप आणि एमआयएमने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
यामध्ये महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता सर्वाधिक ७ प्रभाग समितीवर शिंदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रत्येक एक उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
दरम्यान, महापलिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचे पाच उमेदवार निवडून आले आहे. या नगरसेवकांच्या जोरावर प्रभाग समिती अध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणाऱ्या एमआयएम पक्षाने देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार दिपाली भगत हिच्या समोर एमआयएमचे नफीज अन्सारी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेकडून नौपाडा-कोपरी प्रभाग समितीसाठी मीनल संखे, वागळे इस्टेटसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर प्रभाग समितीसाठी निर्मला कणसे, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री जेरी डेव्हिड, माजीवाडा-मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव आणि कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून उथळसर प्रभाग समितीसाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मुंब्रा प्रभाग समितीसाठी दीपाली भगत यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेने सातपैकी पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांच्या नेतृत्वात महिलांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला नेतृत्वाला अधिक प्राधान्य देण्देयात आले असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.