BJP Shivsena Clash: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा कमळ विरुद्ध धनुष्यबाण संघर्ष पेटला; सरनाईकांनी अचानक टाकलेल्या बॉम्बनं ठाण्यात भाजप संतापली

Mahayuti Politics: राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयाचा अभाव आणि पक्षांमधील वाद स्पष्ट झाले आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि जाहीर कार्यक्रमांमधील दुजाभाव यांमुळे युतीमधील अंतर्गत दरी चव्हाट्यावर आली आहे.
Devendra Fadnavis Eknath Shinde Pratap Sarnaik
Devendra Fadnavis Eknath Shinde Pratap Sarnaik Sarkarnama
Published on
Updated on

Thane News: राज्यात सत्तेत एकत्र नांदत असले तरी महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये सातत्यानं कुरघोडीचं राजकारण सुरू असते. यातच भाजप आणि शिवसेनेत मुंबई, ठाण्यासह राज्यातही अनेक ठिकाणी स्थानिक संघर्षातून वादाची ठिणगी पडली होती. याचदरम्यान, पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील ओवळा-माजीवाडा मतदारसंघात वादाची ठिणगी पडली आहे.

या वादाचं कारण म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना विरुद्ध भाजप अंतर्गत धगधगणारा वाद पुन्हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ठाण्यात कोणतीही पूर्वकल्पना न देता कार्यक्रम रद्द केल्यानं संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदार, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde Pratap Sarnaik
Chandgad: 'मुश्रीफांवर आरोप कशाला? फडणवीसांना सांगा अन् गोकुळ बिनविरोध करा!' : राजेश पाटलांचे शिवाजी पाटलांना खुले आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दाखले वाटपाचा कार्यक्रम भाजप आणि प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भाजपच्या स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

परिणामी, उपस्थित नागरिकांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. हा कार्यक्रम ओवळा-माजीवाड्यातून थेट सरनाईक यांच्या मीरा-भाईंदर मतदार संघात हा कार्यक्रम त्या भागात हलवण्यात आल्याचा गंभीर आरोप नाव न घेता भाजपने केला आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde Pratap Sarnaik
Maharashtra Cooperative Banks : कर्जमाफीच्या निर्णयाचा सहकारी बँकांना झटका : अहिल्यानगर डीसीसी बँकेचे 114 कोटींचे व्याज बुडणार?

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अचानक शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम रद्द केल्यानं ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सत्ताधारी महायुतीतील ही दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याआधी ठाण्यातील ओवळा-माजीवाडा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स आणि जाहिरातींवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची व राजकीय वर्चस्वावरून चुरस पाहायला मिळाली.

ठाण्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांना व आमदारांना निमंत्रण दिले नसल्याची चर्चा ठाण्यात रंगली. ऐनवेळी निमंत्रण देण्याची पद्धत अयोग्य असल्याचे सांगत भाजप नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयाचा अभाव आणि पक्षांमधील वाद स्पष्ट झाले आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा, स्थानिक पातळीवरील मतभेद आणि जाहीर कार्यक्रमांमधील दुजाभाव यांमुळे युतीमधील अंतर्गत दरी चव्हाट्यावर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com