महाराष्ट्र

त्या' ड्रग्ज पार्टीत शाहरूख खानचा मुलगा आर्यनचाही समावेश?

ताब्यात घेतलेल्या १० जणांपैकी ८ जणांवर अटकेची कारवाई

सरकारनामा ब्युरो

अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने (NCB) ने काल रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका लक्झरी क्रूझ जहाजावर चालणाऱ्या ड्रग पार्टीवर छापा टाकला आहे. या कारवाईत १० जणांना ताब्यात घेतले आहेत. तर, ताब्यात घेतलेल्या १० जणांपैकी ८ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या ८ जणांकडून MDMA, कोकिन, चरस, MD असे ड्रग्ज मिळाल्याची माहिती आहे.

तसेच, चौकशीत या १० जणांमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मला या पार्टीत व्हीआयपी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होत. आपल्याकडून क्रुझरवर येण्यासाठी कोणतीही फी घेण्यात आली नाही. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं, असं स्पष्टीकरण आर्यन खानने दिलं आहे. दरम्यान या कारवाईत ताब्यात घेतलेल्या लोकांची आज चौकशी होणार आहे. अद्याप कुणाला अटक केली नसल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज चौकशीदरम्यान नेमकी काय माहिती समोर येतेय याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, एनसीबीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी क्रुझवर ड्रग्झ पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. माहितीच्या आधारे एनसीबीने सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज घेतलं जात असल्याचं लक्षात येताच एनसीबीच्या पथकाने पार्टी थांबवली आणि क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं. कारवाई दरम्यान सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. या प्रकरणी क्रुझवर काम करणारे १० कर्मचारी आणि ६ पार्टी आयोजकांना समन्स बजावून बोलावलं आहे. या क्रूजवरील पार्टी एका परदेशी कंपनी आणि मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT