लक्झरी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचा छापा: 10 जण ताब्यात

लक्झरी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचा छापा: 10 जण ताब्यात

या कारवाईत १० जणांना ताब्यात घेतले असून त्यात काही महिलांचा आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश आहे.
Published on

अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोने (NCB) ने काल रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका लक्झरी क्रूझ जहाजावर चालणाऱ्या ड्रग पार्टीवर छापा टाकला आहे. या कारवाईत १० जणांना ताब्यात घेतले असून त्यात काही महिलांचा आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश आहे. त्याचबरोबर एक वरिष्ठ पोलिस अधिकारीही या जहाजावर पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. क्रूझवर आठ तासांहून अधिक काळ हा छापा सुरू आहे.

लक्झरी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीचा छापा: 10 जण ताब्यात
'नथुराम गोडसे'च्या टीझरवरुन मांजरेकरांवर आव्हाड संतापले

एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या अभिनेत्याच्या मुलाला NCB ने ताब्यात घेतलं आहे त्याने लेन्सच्या डबीत ड्रग्ज आणले होते. तर महिलांनी पर्सच्या हँडलमधून आणि सॅनिटरी पॅडच्या आत लपवून आणले होते. काहींनी अंडरवीयरच्या शिलाईच्या आत आणि पॅन्टच्या शिलाईच्या आत लपवून ड्रग्ज आणले असल्याचे तपासात उघड झाले आहे.

एनसीबीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला निघालेल्या लक्झरी क्रुझवर ड्रग्झ पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. माहितीच्या आधारे एनसीबीने सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज घेतलं जात असल्याचं लक्षात येताच एनसीबीच्या पथकाने पार्टी थांबवली आणि क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं. कारवाई दरम्यान सर्व एनसीबी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. या प्रकरणी क्रुझवर काम करणारे १० कर्मचारी आणि ६ पार्टी आयोजकांना समन्स बजावून बोलावलं आहे. या क्रूजवरील पार्टी एका परदेशी कंपनी आणि मनोरंजन वाहिनीने संयुक्तपणे आयोजित केली होती.

या क्रूझवर ही पार्टी समुद्रामध्ये म्हणजेच 100 नॉटिकल मैल आत होणार होती. या पार्टीत एक परदेशी कलाकार आणि दुसऱ्या कलाकाराचा मुलगा होता. पण त्याला कदाचित या छाप्याचा सुगावा मिळाला आणि ते निघून गेले.

ही माहिती मिळाल्यानंतर, क्रूझवर उपस्थित असलेल्या 25 लोकांच्या ग्रुपवर समुद्रात खोलवर जाण्यापूर्वी छापा टाकला आणि क्रूझ थांबवली. क्रूझवर सुमारे 30 ग्रॅम चरस, सुमारे 20 ग्रॅम कोकेन, एमडीएमए औषधांच्या सुमारे 25 गोळ्या, सुमारे 10 ग्रॅम एमडी औषधे जप्त करण्यात आली. कायदेशीर कारवाई करण्याआधी, एनसीबी या सर्वांच्या वैद्यकीय चाचण्या करून घेणार आहे. ताब्यात घेतलेल्यांनी क्रूज पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन केले आहे की नाही, याबाबत तपास केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com