CM Eknath Shinde-MLA Ram Kadam News Sarkarnama
महाराष्ट्र

MLA Ram Kadam On CM Shinde : मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारालाही पटवले..

BJP News : घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कामाचा झपाटा, शिवसैनिकांच्या भेटीगाठी, दिवस-रात्र कधीही उपलब्ध होणारे याची चर्चा राज्याच्या राजकारणात मोठ्या चवीने होत असते. (MLA Ram Kadam BJP) शिंदे गटाचे नेते, मंत्री, शिवसैनिक तर त्यांच्या या धडाडीचे कौतुक करतांना थकत नाहीतच. पण शिंदे यांनी आपल्या कार्यक्षमतेची भुरळ भाजपच्या आमदारांना देखील घातली आहे. भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा झपाटा, सर्वसामान्य आणि कार्यकर्त्यांना ते देत असलेला वेळ याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

आज मुंबईत दहीहंडीची धूम सुरू आहे. अगदी दुपारपासूनच गोविंदा पथक थरावर थर लावून दहीहंडी फोडत आहेत. (Mumbai) राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना दहीहंडी म्हणजे शक्तीप्रदर्शनाची एक संधीच असते. त्यामुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र दहीहंडी महोत्सवांचे आयोजन मोठ्या संख्येने केले जाते. आपल्या नेत्याने तिथे हजेरी लावावी, अशी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याची इच्छा असते. मुंबईतील ठाणे शहराला दहीहंडीची मोठी परंपरा आहे.

दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने ठाण्यात मोठी दहीहंडी बांधली जाते. सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील या महोत्सवाचा भाग राहिले आहेत. आता तर ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या दहीहंडी महोत्सवाला भेट देऊन गोंविदा पथकांचा उत्साह वाढवावा, अशी अपेक्षा बाळगणे गैर नाही. (BJP) त्यातच मी सामान्य लोकांचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्यासाठी काम करतो असे सांगणाऱ्या शिंदेंकडून तर अशी अपेक्षा अधिकच वाढते.

घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. तेव्हा राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांबद्दलच्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या. सात-सात दिवस न झोपणारी व्यक्ती कोण ? असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेईल असं ते म्हणाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांचे काम जवळून अनुभवले आहे. वर्षभरापुर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हापासून एकनाथ शिंदे हे पायाला भिंगरी लागल्यासारखे राज्यात, देशात फिरत आहेत.

एखाद्या कार्यकर्त्याला शब्द दिला, तर मग तो पुर्ण करतांना ते कधी घड्याळ पाहत नाहीत, की दिवस-रात्र. त्यांच्या या गुणांमुळेच ते केवळ शिवसेनेतच नाही, तर मित्र पक्षांमध्ये देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच स्वभावाचा आणि दिवसाच्या १५-२० तास काम करण्याचा विशेष उल्लेख राम कदम यांनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या सर्वसामान्य नागरीकांसमोर केला. सलग सात दिवस न झोपणारे, प्रचंड मेहनती आणि कुणालाही भेटायला तत्पर राहणारे मुख्यमंत्री असे म्हणत कदम यांनी शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

सफाई कामगार असो की कुणी गरीब प्रत्येकाला कोणत्याही वेळी भेटणारा असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला, असेही कदम म्हणाले. एकनाथ शिंदे हे सामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत, ते त्यांच्या दिलदारपणामुळे. छत्रपती संभाजीनगरात जेव्हा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले होते, तेव्हा त्यांनी जिल्ह्यातील आपल्या सर्व आमदारांच्या कार्यालयाला भेटी दिल्या होत्या. अगदी रात्री दोन वाजले तरी त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचे दिसून आले होते. विरोधक त्यांच्यावर टीका करत असले तरी मित्र पक्षांना मात्र मुख्यमंत्र्यांचे कौतुक वाटते हेच राम कदम यांनी व्यक्त केलेल्या प्रेमावरून दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT