Uddhav Thackeray - Amit Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT : मनसे विरुद्ध तक्रार, भाजपचा आक्षेप पण उद्धव ठाकरेंच म्हणणं निवडणूक आयोगानं ऐकलं

Shivsena UBT Election Commission : मनसेच्या दीपोत्सवावर आक्षेप नोंदवत माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात या दीपोत्सवाचा खर्च नोंदवण्याची देखील मागणी करण्यात आली होती.

Roshan More

Shivsena UBT : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दीपोत्सवाचे आयोजन करणाऱ्या मनसेच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तक्रारीची दखल केली होती. भाजपने ट्विट करत उद्धव ठाकरे हे मतांसाठी धर्म बदल आहेत का? असे ट्विट करत ठाकरेंच्या तक्रारीवर एकप्रकारे आक्षेपच घेतला होता. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.

निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंगाची तसेच कार्यक्रमाचा संपूर्ण खर्चाची चौकशी सुरू करण्यात आल्याच पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठवले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनसेच्या दीपोत्सवावर आक्षेप नोंदवत माहीम मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात या दीपोत्सवाचा खर्च नोंदवण्याची देखील मागणी केली होती. निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे अमित ठाकरेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मनसेच्या विरोधात तक्रार करण्यात आलेल्या निवेदनाचा फोटो भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये भाजपने उद्धव ठाकरे हे हिंदु सणांना विरोध करत आहेत का? असा प्रश्न विचारला.

उद्धव ठाकरेंकडून नेमका आक्षेप काय?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून 'दीपोत्सव' साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने कारवाईचे निर्देश धावेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT