Narendra Modi : मोदींनी महाराष्ट्रातील प्रचाराचा नॅरेटिव्ह सेट केला! खर्गेंनीच आयते कोलीत दिले हाती...

Maharashtra Assembly Election Mallikarjun Kharge BJP Congress : काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांतील आर्थिक स्थितीचे उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केला आहे.
Mallikarjun Kahrge, Narendra Modi
Mallikarjun Kahrge, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपच्या हाती आयते कोलीत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लगेच प्रचाराचे नॅरेटिव्ह सेट करत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेसच्या विविध आश्वासनांवरून पंतप्रधानांनी निशाणा साधला आहे.

हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असून काही योजनांमध्ये राज्यांवर आर्थिक भार पडला आहे. कर्नाटकातील महिलांना मोफत बसची योजनाही गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरून खर्गेंनी सरकारचे कान उपटले आहेत. राज्य दिवाळखोरीत निघणार नाही, अशीच आश्वासने द्यायला हवीत, असा सल्लाच खर्गेंनी दिला आहे.

Mallikarjun Kahrge, Narendra Modi
Arvind Sawant News : खासदार सावंतांच्या अडचणीत वाढ; शायना एनसींच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

खर्गे यांचे हेच विधान भाजपसाठी आयते कोलीत ठरले आहे. त्यावरून शुक्रवारी मोदींनी ट्विट करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला आता समजले आहे की, खोटी आश्वासने देणे सोपे आहे, पण त्याची अंमलबजावणी करणे अवघड किंवा असंभव आहे. ते प्रचारातून सातत्याने लोकांना आश्वासने देतात. पण त्यांना हेही माहिती असते की, ही आश्वासने पूर्ण होऊ शकत नाहीत.

आता लोकांसमोर काँग्रेसचा पर्दाफाश झाला आहे. आज काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यापैकी कोणत्याही राज्यावर नजर टाकली तरी लक्षात येईल की, विकासाची गती आणि राज्याची आर्थिक स्थिती वाईट बनली आहे, अशी टीका मोदींनी केली आहे.

Mallikarjun Kahrge, Narendra Modi
Mallikarjun Kharge : खर्गेंनी नेत्यांचे कान उपटले; महाराष्ट्रात काँग्रेसची 'गॅरंटी' नाही?

काँग्रेसची तथाकथित गॅरंटी अपूर्ण राहिली आहे. त्या राज्यांतील लोकांसोबत हा मोठा धोका आहे. असल्या राजकारणाचे गरीब, युवक, शेतकरी आणि महिला शिकार बनत आहेत. त्यांना योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. सध्याच्या योजनाही कमजोर केल्या जात आहेत, असा निशाणाही मोदींनी साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com