Uddhav Thackeray, Anand Nirgudkar Sarkarnama
महाराष्ट्र

Anand Nirgud : राजीनामा देणाऱ्या मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर दोन मंत्र्यांचा दबाव!

सरकारनामा ब्यरो

Nagpur News : मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला दिले आहे. मात्र, या कामाच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळी कारणे सांगून आयोगाचे सदस्य राजीनामा देत आहेl. मंगळवारी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुड यांनीही राजीनामा दिला. या संदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. दोन मंत्र्यांच्या दबावामुळे हे राजीनामा सत्र सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्या दोन मंत्र्यांची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारला देखील थेट विधानसभेत यावर उत्तर द्यावे लागले.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केली जात आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे. यासाठी मराठा समाजातील मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगाला काम देण्यात आले आहे. मात्र, या कामात राज्य सरकारचा तसेच दोन मंत्र्यांचा हस्तक्षेप वाढला असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे वेगवेगळी कारणे देऊन मागासवर्ग आयोगाचे सदस्य राजीनामा देत आहेत. आयोगाच्या सदस्यांच्या राजीनाम्यामागे सरकारचा दबाव असल्याचा आरोप होत आहे.

उद्धव ठाकरेंनी तर थेट मागासवर्ग आयोगावर दबाव आणणाऱ्या दोन मंत्र्याची नाव जाहीर करा, त्यासाठी एसआयटी नेमा, अशी मागणी केली. तसेच सरकारने मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडकर यांचा राजीनामा स्वीकारला. याचा अर्थ त्यांची राजीनामा या आधीच दिला होता. मग इतक्या दिवस त्यांनी राजीनामा दिल्याचे सरकारने का लपवून ठेवले, असा थेट सवाल ठाकरेंनी केला.

याआधी मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी आयोगातील कामामध्ये वैचारिक मतभेदांमुळे राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्याआधी बबनराव तायवाडे, संजय सोनावणे. बी.एस.किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता. राजीनामा देताना सदस्यांनी वेगवेगळी कारणे दिली असली तरी मंत्र्यांचा वाढत्या दबावामुळे हे राजीनामा सत्र सुरू असल्याचा आरोप होत आहे.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT