Deepak Kesarkar : बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते; उलट तपासणीत केसरकर काय काय म्हणाले ?

Balasaheb Thackeray : केसरकरांचा बाळासाहेबांशी काहीही संबंध नाही, अनिल परबांचा घणाघात...
Deepak Kesarkar,Balasaheb Thackeray
Deepak Kesarkar,Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीने आता वेग धरला आहे. या प्रकरणी होत असलेल्या उलट तपासणीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. आता तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उलट तपासणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी धाडसी विधान केले आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार दोन्ही गटांचे वकिल साक्षीदारांची उलट तपासणी करत आहेत. पहिल्या सत्रात शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची उलट तपासणी झाली. यावेळी केसरकरांनी बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते, असे गंभीर वक्तव्य केले आहे. केसरकरांच्या या वक्तव्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केसरकरांना अनेक प्रश्न विचारले. केसरकरांनी यातील काही प्रश्नांची उत्तरे दिली तर काही प्रश्नांना बगल दिली. यावेळीच केसरकरांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत धक्कादायक विधान केले. त्यानंतर ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी सोडली नाही. केसरकरांच्या विधानानंतर ठाकरे गटाने शिंदे गटाला कोंडीत पकडण्याची तयारी केल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

Deepak Kesarkar,Balasaheb Thackeray
Anil Parab On Farmers : 'ऑपरेशन सक्सेस, पेशन्ट डेड !' अनिल परबांनी शेतकऱ्यांना थेट श्रद्धांजलीच वाहिली

दीपक केसरकर काय म्हणाले ?

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांनी उलट तपासणीत मंत्री केसरकरांची चांगलीच कोंडी केली होती. यावेळी त्यांनी केसरकरांना अनेक प्रश्न विचारले. याला उत्तर देताना केसरकरांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) लोकशाही मानत नसल्याचे सांगितले. 'बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठलीही तत्वे पाळलेली नाहीत. ते मनमानीपणे पक्ष चालवत होते. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही निवडणुका घेतलेल्या नाहीत,' अशा आशयाची विधाने केल्याची माहिती मिळत आहे.

Deepak Kesarkar,Balasaheb Thackeray
Ram Satpute : आमदार राम सातपुतेंना विधानसभा अध्यक्षांनी झापलं; अधिवेशनात नेमकं काय घडलं ?

अनिल परबांनी घेतला समाचार

बाळासाहेबांबाबत बोलल्यानंतर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर ठाकरे गटाने टीकेची झोड उठवली आहे. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब म्हणाले, 'केसरकरांचे विधान संतापजनक आहे. यातून त्यांची बाळासाहेबांवरील निष्ठा बेगडी असल्याचे दिसून आली. शिंदे गट वारंवार सांगतो की, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. आता ते काय उत्तर देणार,' असा सवालही परब यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केसरकर आणि बाळासाहेबांचा संबंधच नाही

'शिंदे गटासोबत गेलेले केसरकर जाता जाता आम्हाला बाळासाहेबांबाबत शिकवून गेले होते. मात्र ते शिवसेनेत आले २०१४ मध्ये. तर बाळासाहेबांचे निधन झाले २०१२ मध्ये. त्यामुळे त्यांचा बाळासाहेबांशी कधीही संबंध आला नाही. आता साक्षी पुराव्यातून त्यांचे खरे स्वरूप समोर आले आहे. बाळासाहेबांबाबत त्यांना कुठलेही प्रेम नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना फोडली, हे आता त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे,' असा घणाघातही अनिल परब यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Deepak Kesarkar,Balasaheb Thackeray
Devendra Fadnavis News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचा गौप्यस्फोट! पोलिस आयुक्तांचे पत्र केले उघड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com