IAS Transfer
IAS Transfer Sarkarnama
महाराष्ट्र

‘आयएएस’ आधिकाऱ्यांच्या बहुप्रतिक्षित बदल्यांमध्ये ‘शिंदेराज’ची प्रचिती

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील तब्बल ४४ आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. शिवसेना फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्या मर्जीतल्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. आधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,(Uddhav Thackeray) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या आधिकाऱ्यांशी जुळवून घेत त्यांना पहिल्या पसंतीच्या नियुक्त्या देऊन या आधिकाऱ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टोकाची टीका करणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांना अडगळीत टाकण्याऐवजी नवी मुंबईत आणून ठाकरे आणि राऊत यांना एक वेगळा संदेश दिला आहे.दुसरीकडे आधिकारी नाराज होणार नाहीत याची काळजी घेत बहुतांश आधिकाऱ्यांशी बोलून, त्यांना विश्‍वासात घेऊन नियुक्त्या केल्याचे दिसत आहे. यातून राज्याच्या प्रशासनावर मुख्यमंत्री शिंदे यांचा वरचष्मा दिसत आहे.

ठाण्यातून विपीन शर्मांना बदलून नवी मुंबईचे आयुक्त अभिजीत बांगर यांना ठाण्याच्या मोहिमेवर आणले आहे. राज्यभरातील अनेक आधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नाराजांनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांच्या संमतीनेच बदल्या करून आपली प्रशासनावरील मांड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे दिसत आहे.

आधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी पुढीलप्रमाणे. नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण या क्रमाने:

१) श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)

२) विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर)

३) अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड)

४) डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई)

५) डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग)

६) श्रीमती.जयश्री एस. भोज (डीजीआयपीआर आणि एमडी, महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार)

७) परिमल सिंग (प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)

८) ए.आर.काळे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई)

९) राजेश नार्वेकर (महापालिका आयुक्त नवी-मुंबई महानगरपालिका)

१०) अभिजीत बांगर (ठाणे महापालिका आयुक्त)

११) डॉ.विपिन शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)

१२) नीलेश रमेश गटणे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,एसआरए, पुणे.)

१३) सौरभ विजय (सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग)

१४) मिलिंद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ)

१५) अविनाश ढाकणे (मॅनेजिंग डायरेक्टर, दादासाहेब फाळके फिल्मनगरी)

१६) संजय खंदारे (प्रधान सचिव -१ सार्वजनिक आरोग्य विभाग)

१७) डॉ. अनबलगन पी.(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी)

१८) दीपक कपूर, (अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग)

१९) श्रीमती. वल्सा नायर (प्रधान सचिव, गृहनिर्माण)

२०) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग)

२१) मिलिंद म्हैसकर (प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क)

२२) प्रवीण चिंधू दराडे ( सचिव, पर्यावरण विभाग)

२३) तुकाराम मुंढे (आयुक्त एफडब्लू आणि संचालक, एनएचएम, मुंबई)

२४) अनुप कुमार यादव, (सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग)

२५) डॉ. प्रदीप कुमार व्यास (अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग)

२६) डॉ. अश्विनी जोशी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)

२७) दीपेंद्र सिंह कुशवाह (विकास आयुक्त,उद्योग)

२८) अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे)

२९) श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)

३०) मनुज जिंदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)

३१) सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)

३२) अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)

३३) राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)

३४) श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)

३५) कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)

३६) रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा)

३७) विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)

३८) श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)

३९) के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)

४०) कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)

४१) राजेंद्र निंबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी)

४२) विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)

४३) डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)

४४) एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT