Mumbai News : मुंबईत पुन्हा एकदा बॉलिवूड हादरले असून, जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला आहे. टायगर श्रॉफ येथे फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात टायगर श्रॉफच्या गाडीचा चालक व अन्य एकजण जखमी झाला आहे. या खळबळजनक घटनेनंतर मुंबईसह बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असून, याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. तसेच, याच ट्वीटमध्ये सलमान खानचे नाव घेत त्याच्यासोबत काम करणाऱ्याचा पुढचा नंबर असेल, असा गर्भित इशारा दिला आहे.
मुंबईच्या जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांकडून पाच राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात टायगर श्रॉफला कोणतीही इजा झाली नसून, तो थोडक्यात बचावला आहे. पण टायगर श्रॉफच्या गाडीचा चालक व अन्य एकजण जखमी झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपासासाठी तातडीने पावले उचलली असून, १२ पथके तैनात केली आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन करून तपास वेगाने करण्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
टायगर श्रॉफवर मुंबईत झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा गुंड अनिल पंडित याची एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, ज्यामध्ये त्याने टायगरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये अनिल पंडितने त्याने आणि अरमान संधूने मिळून हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले आहे. तसेच, जो कोणी सलमान खानसोबत काम करेल, त्याचा पुढचा नंबर लागेल, असाही इशारा दिला आहे.
तसेच, आपल्या पोस्टमध्ये, “टायगर श्रॉफच्या बाबतीत जे आज घडले आहे, त्याची जबाबदारी आम्ही घेतो. त्याला आम्ही फोन करून समजावून सांगितले होते. पण त्याला ते समजले नाही, म्हणून आज त्याला ते अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगितले,” असे म्हटले आहे.
तसेच, आपल्या पोस्टमध्ये अनिल पंडितने, “मुंबई चित्रपटसृष्टीतील जो कोणी आमचे ऐकणार नाही किंवा सलमान खानसोबत काम करेल, त्याचा पुढचा नंबर असेल. वाट पाहा,” असेही म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.