BJP vs TMC news : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयाची देशभर चर्चा असताना, भाजपचे राज्यसभेतील सदस्य, कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी, ममता दीदी यांचं, असं वागणं योग्य नाही, लढाई लढायची असेल, तर त्यांनी कायद्याने लढावी, असा सल्ला देणारी प्रतिक्रिया दिली आहे.
अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पराभव झाला आहे. यानंतरही त्यांनी आपल्याला पराभव मान्य नाही, आपणच मुख्यमंत्री आहोत, असे म्हणणे हे त्यांच्या स्वतःसाठी आणि पक्षासाठी अत्यंत चुकीचे आहे. पराभव मान्य नसेल, तर कायद्याच्या चौकटीत ते यावर आपली बाजू मांडू शकतात."
गेल्या पंधरा वर्षांपासून त्या पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. यातूनच त्यांना पराभवाचा एवढा मोठा धक्का बसला आहे की, त्याच्या परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊ लागलाय, हे पहायला मिळाले आहे, असेही भाजप (BJP) खासदार उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
मात्र पराभव मान्य नाही, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, असे सांगून आपल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांना भाजपविरोधात प्रोत्साहित करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का? असा सवाल देखील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.
पराभव मान्य नाही, असे वक्तव्य करून त्या घटनेच्या विरोध वागत आहेत. त्यांच्या शहाणपणात भर पडली नाही, तर मात्र पश्चिम बंगालच्या राज्यपालांना यात हस्तक्षेप करावा लागले. तृणमूल काँग्रेसचे सरकार बरखास्त करावे लागून, भाजपला सत्तेसाठी आमंत्रण द्यावे लागेल, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यालय टार्गेट केली जात आहे. जाळली जात आहे. आतापर्यंत, कोलकात्यातली टाॅलीगंज, कसबा, बैरूपूर, कामरहाती, बारनगर उपनगर, हवाडा, बहरामपूर या भागातील तृणमूल काँग्रेसची कार्यालये टार्गेट करण्यात आली आहे. मात्र भाजपने, या हिंसाचाराशी कार्यकर्त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.