Raj Thackeray News Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackrey : मॉनिटर येण्यापूर्वी मला घालवा; व्यासपीठावरून राज ठाकरे असं कोणाला म्हणाले...

Sachin Waghmare

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु असलेल्या 100 व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची प्रकट मुलखात झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी चौफेर फटकेबाजी करताना अनेकांवर टीका टिप्पणी करीत त्यांची कोंडी केली. यावेळी मुलखातकर दीपक करंजीकर यांच्या प्रत्येक प्रश्नाला टोलवत त्यांनी मुलाखतीप्रसंगी चांगलीच धमाल केली.

यावेळी राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी अनेक राजकीय नेत्यांना कानपिचक्या घेत कलावंतांनी कसे वागायला हवे, याचा पाढाच सर्वांसमोर वाचला. पाच वाजण्यास १० मिनिटे शिल्लक असताना हजरजबाबी असलेल्या राज ठाकरे यांनी मुलाखतकार दीपक करंजीकर यांची फिरकी घेत, 'मॉनिटर येण्यापूर्वी मला येथून घालवा', असे म्हणताच उपस्थित मंडळींत एकच हशा पिकला.

त्याचवेळी 'मॉनिटर येण्यापूर्वी मला येथून घालवा', असे ते का म्हणाले याचा तर्कवितर्क लढवला जाऊ लागला. त्यावेळी लक्षात आले की, त्यांच्या मुलाखतीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ वाजण्याच्या दरम्यान नाट्यसंमेलनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने त्यांचा लवाजमा येणार होता. हा लवाजमा येण्यापूर्वी मला येथून बाहेर पाठवा, असा राज ठाकरे यांच्या म्हणण्याचा अर्थ होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरेंनाच पडला टोपण नावाचा विसर...

यावेळी उपस्थित असलेल्या खूप कमी जणांना माहिती असेल की राज ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस (devendra fadanvis) यांच्या टोपण नावाचा उल्लेख यावेळी केला. मराठी कलाकार जेव्हा सार्वजनिकरित्या एकमेकांना भेटतात. तेव्हा एकमेकांच्या शाॅर्ट नावाने आवाज देतात. ते एकमेकांना सार्वजनिकपणे मान देताना दिसत नाहीत, असे म्हणत यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखतीवेळी संभाषण करताना टोपण नावाचा उल्लेख टाळा मामा, काका म्हणू नका सर असा उल्ल्लेख करा, असा संदेश दिला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनाच त्याचा विसर पडल्याची चर्चा संमेलनस्थळी रंगली होती.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT