महाराष्ट्र

Devendra Fadnavis Reaction : तुकाराम मुंढे बडतर्फ होणार का? विधानसभेत खडाजंगी, फडणवीसांनी घेतली गंभीर दखल...

Big political controversy in the Maharashtra Assembly महाराष्ट्र विधानसभेत तुकाराम मुंढे प्रकरणावर खडाजंगी. बडतर्फीची चर्चा आणि फडणवीसांनी घेतलेली गंभीर दखल यामुळे राजकीय वातावरण तापले.

Rashmi Mane

तुकाराम मुंढे यांच्यावर होणाऱ्या कारवाईचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात अचानक चांगलाच तापला आहे. नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सभागृहात गंभीर आरोप मांडत मोठी खळबळ उडवली. त्यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे यांच्या गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना फोनवरून धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यावरून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधानसभेत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

खोपडे यांनी ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापर्यंत पोहोचवली असून, त्यांनी सिताबर्डी पोलिस ठाण्यातही औपचारिक तक्रार दाखल केली आहे. एखाद्या सनदी अधिकाऱ्याविरोधात प्रश्न विचारल्यावर आमदाराला धमकी येणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे या विषयाने आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण दिले आहे.

नागपूरचे माजी महापालिका आयुक्त असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे नाव कायमच चर्चेत राहिलेले. कठोर प्रशासक म्हणून ओळख असली तरी त्यांच्या काही निर्णयांवर पूर्वीही वादंग उठले होते. आता पुन्हा एकदा भाजपचे आमदार त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

भाजपचा आरोप आहे की, नागपूर महापालिकेत आयुक्त पदावर काम करत असताना मुंडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा कार्यभार नियमशिवाय स्वतःकडे घेतला. त्यांना शासनाची अधिकृत नेमणूक नसतानाही त्यांनी हा प्रकल्प हाताळून काही ठराविक कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात पेमेंट केल्याचा आरोप करण्यात आला. या पैशांपैकी काही रकमा नियमांचे पालन न करता दिल्याचे म्हणण्यात येते. त्याचबरोबर काही महिला अधिकाऱ्यांशी त्यांनी उद्धटपणे वागल्याच्या तक्रारीही त्या काळात नोंदवण्यात आल्या होत्या.

या दोन्ही प्रकरणांवर एफआयआरही दाखल झाला होता. मात्र त्या काळात महाविकास आघाडी सरकार असल्याने योग्य कारवाई झाली नसल्याचा भाजप आमदारांचा दावा आहे. आता या दोन्ही जुन्या प्रकरणांना पुन्हा पुढे आणून मुंडे यांच्या निलंबनाची मागणी अधिवेशनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यातच आज सभागृहात या सगळ्या घडामोडींवर जोरदार चर्चा रंगली. खोपडेंना मिळालेल्या धमकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली. त्यांनी सांगितले की, एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्याबद्दल धमकी येणे हे गंभीर प्रकरण असून याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. धमकी हा विशेषाधिकारभंगाचाही मुद्दा असल्याने सरकार याचा तपास करून योग्य ते पाऊल उचलेल. तसेच तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT