

कोणत्याही क्षणी राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. अधिवेशन संपल्यानंतर 15 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाल सुरू आहे. त्यातच कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजप, शिवसेना यांच्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस यांची कासवाची चाल सुरू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर अनेकांचे पक्षप्रवेश शिवसेना आणि भाजपमध्ये झाले. अशा परिस्थितीत शिवसेना आणि भाजपकडे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणारे आणि प्रभागातील प्रमुख दावेदार यांचा अधिक भरणा झाला आहे. प्राथमिक टप्प्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपला 34 पेक्षा अधिक जागेची मागणी केली. तर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेला महायुतीतील 30 जागेवर दावा केला होता.
तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या दाव्यावर राष्ट्रवादीला कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत यायचं कसं हे चांगलेच माहिती आहे. शिवाय कासवाची चाल ही राष्ट्रवादीची असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील पालकमंत्री आमदार प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, यांच्यासह काही प्रमुख नेत्यांची मुंबईत महिनाभरापूर्वी बैठक झाली. त्यावेळी प्राथमिक टप्प्यात कोल्हापूर जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
मात्र आजच्या घडीला जिल्हा परिषदे अघोर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी वेग घेतला आहे. या संदर्भात पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा होणार आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि शिवसेनेकडून महायुतींच्या वरिष्ठ नेत्यांकडे भाजप ३३, शिवसेना 33, आणि राष्ट्रवादीला 15 जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर 35-35-11 असाही प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. या प्रस्तावावर वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
2016 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसकडे ३०, राष्ट्रवादी काँग्रेस १४, ताराराणी आघाडी १९, भाजपकडे १४, शिवसेनाकडे ४ जागा होत्या. सध्या भाजप आणि ताराराणी आघाडी एकत्र झाल्याने भाजपने 34 जागांवर दावा केला आहे. तर शिवसेनेकडून अनेक प्रभावी चेहरे पक्षात आल्याने त्यांनी देखील पेक्षा अधिक जागांवर दावा केला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या राजकारणात अनेक मातबरांचे पक्षप्रवेश झाले. या पक्षप्रवेशांमध्ये शिवसेनेने काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीतील काही विद्यमान नगरसेवक सोबत घेतले.
तर भाजपकडून ही अनेकांचे पक्ष प्रवेश झाले. सध्या महायुती म्हणून एकत्र लढत असताना केवळ राजकीय पक्षामध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे इथून पुढे महायुती मधील इच्छुक उमेदवार आपल्या पक्षात न घेण्याचे धोरण वरिष्ठ नेत्यांचे ठरले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे यांच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवार महायुतीत घेण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे. या सर्व घडामोडीत शिवसैनिक कडून देखील अधिकच्या जागा वाटपाचा आग्रह आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आता या प्रस्तावाला कसे उत्तर देतात हे देखील पहावे लागणार आहे.
15 डिसेंबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येणाऱ्या काळात महायुतीची नजर काँग्रेसच्या मातब्बर नगरसेवकांवर आहे. या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून आणि भाजपकडून होत आहे. मुळे येणाऱ्या काळात काही नगरसेवक आपल्या सोबत येतील असा दावा शिवसेना आणि भाजपकडून करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.