Tukaram Mundhe Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Mundhe latest FDA action : तुकाराम मुंढेंचा मुंबईत धडाका! FDAची मोठी कारवाई, टनभर भेसळयुक्त मिठाई अन् मावा जप्त

FDA raid on adulterated sweets in Mumbai : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली. भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त करण्यात आला असून अन्नसुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Rashmi Mane

मुंबईत अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त मिठाई आणि माव्याचा मोठा साठा जप्त केला आहे. शहरातील गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरात अचानक छापेमारी करून अधिकाऱ्यांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला.

FDAच्या पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मिठाई आणि मावा साठवून ठेवलेला आढळून आला. या तपासणीदरम्यान एकूण 1,328 किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची अंदाजे बाजार किंमत 3 लाख 60 हजार 380 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

कारवाईदरम्यान एका व्यापाऱ्याकडून 89 किलो संशयित मावा देखील ताब्यात घेण्यात आला. या माव्याच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाल्याने त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेली सर्वात गंभीर बाब म्हणजे मिठाई आणि माव्याची साठवणूक अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत करण्यात येत होती. अन्नपदार्थ साठवताना आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी दर्जेदार आणि विश्वासार्ह ठिकाणांहूनच खरेदी करावी, तसेच संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन FDAकडून करण्यात आले आहे. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळातही अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT