

Mumbai News : मुंबईतील वांद्रे येथील हिरे स्कूल ऑफ डिझाईन या शिक्षण संस्थेवर बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून कारवाई करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शुल्क परत करण्याचे निर्देश राज्य सरकारने कॉलेज प्रशासनाला दिले आहेत.
याशिवाय, तंत्रशिक्षण विभागाने भाऊसाहेब हिरे एस. एस. ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद हिरे, प्राचार्य सुनील मगदूम यांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
हिरे महाविद्यालयाने मणिपूर राज्यातील संगाई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची संलग्नता घेतली होती. मात्र, अनियमितांमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठाची मान्यता रद्द केली होती. ही बाब कॉलेजने विद्यार्थ्यांपासून लपवून ठेवली. हिरे स्कूल ऑफ डिझाईन संस्थेतील फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.
हिरे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याप्रकरणी तंत्रशिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. एकुण १३४ विद्यार्थ्यांनी या या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले असून त्यांनी भरलेले सर्व शुल्क परत करण्याचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने कॉलेज प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार ३० दिवसांत कॉलेजला विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क परत करावे लागणार असल्याची माहिती मनविसेचे राज्य सचिव अॅड. संतोष गांगुर्डे यांनी दिली आहे.
बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संस्थेच्या आवारातच हिरे स्कूल ऑफ डिझाईन हे कॉलेज सुरू होते. या कॉलेजमध्ये बीएससी आणि बीव्होक इन इंटेरियर डिझाईन हा अनधिकृत अभ्यासक्रम सुरू होता. त्यामुळे आता बळीराम हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला नोटीस बजावून कॉलेज बंद करण्यासाठी सरकारकडे शिफारस का करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे. यासंदर्भात 15 दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.