Tukaram Mundhe  Sarkarnama
महाराष्ट्र

Tukaram Mundhe : '...तर कारवाई अटळ'; तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, दूध विक्रेते, उत्पादकांसाठी नवे नियम

Tukaram Mundhe Rules Milk Sellers and Producers : हॉटेल्सप्रमाणेच आता दूध व्यवसायातही अंतर्गत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले

Roshan More

Tukaram Mundhe News : राज्यातील दूध उत्पादक, विक्रेते आणि डेअरी चालकांच्या मनमानी कारभाराला आणि अस्वच्छतेला चाप लावण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंनी 'ॲक्शन मोड' ऑन केला आहे. दूध व्यवसायासाठी अत्यंत कडक आणि नवे नियम जाहीर केले असून, नियम न पाळणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे.

दूध स्वीकारण्यापासून ते त्याच्या पॅकिंगपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आता 'थर्ड आय' म्हणजेच कडक तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंढेंचा 'HACCP' फॉर्म्युला

नव्या नियमांनुसार, आता प्रत्येक डेअरी आणि प्रोसेसिंग प्लांटला HACCP (Hazard Analysis and Critical Control Points) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा प्रणाली लागू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुधाच्या तपासणी दरम्यान कोणत्याही टप्प्यावर जर दूध निकृष्ट दर्जाचे किंवा मानकांपेक्षा कमी आढळले, तर ते पुढे प्रक्रियेसाठी पाठवण्याऐवजी जागच्या जागी रिजेक्ट करून नष्ट करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित दूध मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

'क्रॉस कंटॅमिनेशन' रोखण्यासाठी कडक पावले

हॉटेल्सप्रमाणेच आता दूध व्यवसायातही अंतर्गत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. दुधाचे दूषितीकरण रोखण्यासाठी प्लांटमध्ये

दूध स्वीकारण्याची जागा, शीतकरण क्षेत्र, प्रक्रिया क्षेत्र,पॅकिंग आणि साठवणूक यासाठी स्वतंत्र विभाग असणे अनिवार्य आहे. धूर, धूळ, सांडपाणी आणि कीटकांच्या संपर्कात येणाऱ्या दुग्धशाळांवर तात्काळ कायदेशीर बडगा उगारला जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.

...तर परवाने रद्द

बऱ्याच ठिकाणी दूध साठवण्यासाठी आणि वाहतुकीसाठी गंजक्या किंवा निकृष्ट दर्जाच्या भांड्यांचा वापर केला जातो. यावर चाप लावत तुकाराम मुंढे यांनी जाहीर केले की, दुधाच्या संपर्कात येणारे सर्व पृष्ठभाग, पाईपलाईन्स, टाक्या आणि भांडी ही केवळ आणि केवळ 'फूड ग्रेड' स्टेनलेस स्टीलचीच असावीत. विषमुक्त आणि गंजरोधक साहित्याचा वापर न करणाऱ्या आस्थापनांचे परवाने थेट रद्द होऊ शकतात.

ग्राहक राजाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध माफियांची गय केली जाणार नाही. फसाईच्या (FSSAI) मानकांचे १००% पालन न करणाऱ्या डेअरींवर थेट टाळे ठोकण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT