IAS Officer Tukaram Mundhe sarkarnama
महाराष्ट्र

FDA Tukaram Mundhe: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच कुऱ्हा ग्रामपंचायतीचा धाडसी निर्णय, तुकाराम मुंढेंचा फोटो घराघरांत झळकणार...

FDA Commissioner Action: एकीकडे तुकाराम मुंढेंच्या पुन्हा एकदा बदलीच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच सर्वसामान्यांकडून पहिल्यांदाच त्यांना भरुभरुन पाठिंबा दिला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कुऱ्हा ग्रामपंचायतनं शनिवारी (ता.15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Deepak Kulkarni

Jalgaon News: डॅशिंग आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी नेहमीच चर्चेत असतात. नियमानुसार कडक व स्पष्ट निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीमुळे मुंढे यांची नागरिकांमध्येही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. याचदरम्यान, आता प्रत्येक घरात तुकाराम मुंढेंचा फोटो झळकणार आहे.

एकीकडे तुकाराम मुंढेंच्या पुन्हा एकदा बदलीच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच सर्वसामान्यांकडून पहिल्यांदाच त्यांना भरुभरुन पाठिंबा दिला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कुऱ्हा ग्रामपंचायतनं शनिवारी (ता.15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कुऱ्हा ग्रामपंचायतीकडून गावातील सर्व ग्रामस्थांना प्रत्येक घरांत आयएएस अधिकारी व एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा फोटो घराघरांत लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भेसळमाफियांविरोधात एकापाठोपाठ एक सुरु असलेल्या धडक कारवायांमुळे धाबे दणाणलेल्यानंतर आता तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर कुऱ्हा ग्रामपंचायतीनं स्वातंत्र्य दिनाच्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ म्हणून त्यांच्या फोटोचं अनावरण केलं आहे. त्यामुळे या गावातील प्रत्येक घरात तुकाराम मुंढेंचा फोटो झळकणार आहे.

राज्यातील असा धाडसी निर्णय घेणारी कुऱ्हा ग्रामपंचायत राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी आयएएस अधिकारी व एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे फोटो घराघरात लावण्याचं आवाहन केलं आहे.

तुकाराम मुंढेंची भारतीय प्रशासकीय 21 वर्षांच्या सेवेत एकूण 25 वेळा बदली करण्यात आली आहे. त्यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई व पुण्यासह राज्यातील अन्न सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्न देणाऱ्या अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर धडक कारवाई केली आहे.

या कारवायांमध्ये त्यांनी काही बेकायदेशीर आस्थापनांचे थेट परवानेच निलंबित किंवा रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात होत असलेल्या कारवायांनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

तसेच लोकं भेसळखोरांविरोधातील कारवायांसाठी स्वत:हून पुढे येत आहे. तर त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीला वैतागलेल्या एफडीएच्याच अधिकाऱ्यांसह कारवायांमुळे त्रस्त झालेल्या भेसळखोरांनी पडद्यामागून मुंढेंच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT