Om Raje Nimbalkar clarifies his role in Operation Tiger Sarkarnama
महाराष्ट्र

Om Raje Nimbalkar: 'ऑपरेशन टायगर'मध्ये ट्विस्ट! "स्वतंत्र गटाच्या पत्रावर सही केलेली नाही, पण..."; राजेनिंबाळकरांनी स्पष्ट केली भूमिका

Om Raje Nimbalkar statement on independent group letter: राज्यात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारफुटीच्या चर्चांमुळं खळबळ उडाली आहे. दोन दिवस याच बातम्यांचा खच पडलेला असतानाच आता पुन्हा एकदा या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

Amit Ujagare

Operation Tiger controversy explained: राज्यात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारफुटीच्या चर्चांमुळं खळबळ उडाली आहे. दोन दिवस याच बातम्यांचा खच पडलेला असतानाच आता पुन्हा एकदा या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

कारण ज्या सहा खासदारांच्या फुटीची चर्चा सुरु आहे त्यात नाव असलेल्या ओम राजेनिंबाळकर यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. आपण अद्याप स्वतंत्र गटाच्या पत्रावर सही केलेली नाही, असं त्यांनी साम टीव्हीच्या सुत्रांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळं या स्वतंत्र गटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

राजेनिंबाळकर नेमकं काय म्हणाले?

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, ओम राजेनिंबाळकर यांनी स्वतः फोन करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, या सहा खासदारांच्या फुटीसंदर्भात जी चर्चा सुरु आहे त्यासाठीच्या पत्रावर मी सही केलेली नाही.

२० जून रोजी पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल येणार आहे. हा निकाल लागल्यानंतर या सगळ्या संदर्भात मी भूमिका घेणार आहे. त्यासाठी मी मतदारसंघात जाणार असून माझ्या मतदारांशी चर्चा करणार आहे.

कारण गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर इथले मतदार त्यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. नेटकऱ्यांकडून देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली असल्याचं दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांशी चर्चा करताना त्यानंतरच आपण भूमिका घेणार आसल्याचं ओम राजेनिंबाळकर यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियातून टीकेची झोड

सहा फुटीर खासदारांच्या यादीत ओम राजेनिंबाळकर यांचं नाव आल्यानं सोशल मीडियावरुन त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठली होती. कारण राजेनिंबाळकर असं काही करतील हे कोणालाही रुचलेलं नाही. इतर खासदारांबाबत लोक तीव्रपणे व्यक्त झालेले दिसत नाहीत कारण या खासदारांबाबत त्यांना विशेष अपेक्षा नाहीत.

त्याचबरोबर फुटलेल्या खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाल्याची चर्चा सुरु असली तरी त्यांनी आपल्या सह्यांचं अधिकृत पत्र जे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणं अपेक्षित आहे ते अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळं या सर्व चर्चा हवेतच सुरु असल्याचंही आता बोललं जात आहे.

पण दुसरीकडं ठाकरे सेनेकडून काढण्यात आलेल्या व्हिप झुगारुन या खासदारांनी हजेरी लावलेली नाही. तसंच त्यांनी आद्याप माध्यमांसमोर येऊन आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीत, त्यामुळं त्यांच्या मनात फुटीची भावना कायम असल्याचंही स्पष्ट होत आहे.

शिवसेनेचा वर्धापनदिन

दरम्यान, त्यातच आज शिवसेनेचा ६०वा वर्धापनदिन आहे, त्यामुळं आज संध्याकाळी दोन्ही गटांच्या सभा मुंबईत होणार आहेत. या सभांना नेमक्या कुठल्या गटाकडून हे कथित फुटलेले खासदार हजेरी लावतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कारण भाजपकडून आणि शिंदेसेनेकडूनही हे फुटलेले खासदार वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातच समोर येतील असं यापूर्वी सांगितलेलं आहे. त्यामुळं आज संध्याकाळीच नेमकं काय घडतंय? यावरच आता दोन्ही शिवसेनांचं आणि महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT