

ShivSena UBT MP : खासदार ओम राजेनिंबाळकर हे सध्या शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षामधील बंडखोर सहा खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले नाव ठरत आहेत. दिल्लीतील राजकीय घडामोडींनंतर आता त्यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागेपर्यंत ते एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेशाचा अंतिम निर्णय घेणार नसल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षातील (Shivsena UBT) काही खासदार फुटून दिल्लीत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना ओम राजेनिंबाळकर हे अचानक संपर्काबाहेर गेले होते. त्यावेळी फुटणाऱ्या खासदारांची नावे चर्चेत येत असताना त्यांनी आपण पुण्यात असल्याचे सांगितले, मात्र त्यानंतर पुन्हा ते कोणाच्याही संपर्कात आले नाहीत.
यानंतर शांतपणे ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली. दिल्लीमध्ये बंडखोर खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेत स्वतंत्र गटासंदर्भात चर्चा केली. या बैठकीत ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) उपस्थित होते. त्यानंतर बंडखोर खासदारांची स्वतंत्र बैठक झाली आणि पुढे एकनाथ शिंदे यांचीही भेट घेण्यात आली. या सर्व घडामोडींमध्ये ओम राजेनिंबाळकर सक्रिय असल्याचे दिसून आले.
दिल्लीतील या राजकीय हालचालीनंतर ओम राजेनिंबाळकर पुण्यात परतले. मात्र पुणे विमानतळावर त्यांना शिवसैनिकांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला. कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केल्याने त्यांना तब्बल तीन तास विमानतळावर थांबून राहावे लागल्याची माहिती आहे. परिस्थिती पाहून त्यांनी नंतर गुपचूप विमानतळातून बाहेर पडल्याचे सांगितले जाते.
सध्या सोशल मीडियावर ओम राजेनिंबाळकर यांच्या निर्णयाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः धाराशिव मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेविरोधात तीव्र नाराजी असल्याचे चित्र आहे. याआधी याच मतदारसंघात मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाविरोधातही मतदानातून स्पष्ट संदेश दिला होता.
याच जनतेच्या संतापाच्या लाटेवर स्वार होत, ओम राजेनिंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अर्चना पाटील यांच्यापेक्षा तब्बल 3 लाख 29 हजार मतांची आघाडी घेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय नोंदवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.