Uday Samant Sarkarnama
महाराष्ट्र

Monsoon Session : अधिवेशनाचे दोन दिवस उरले, उद्योग विभागाकडून श्वेतपत्रिका कधी ?

Uday Samant News : कामकाजाचा क्रम पाहिला तर आजही श्वेतपत्रिका संदर्भात कुठलाही समावेश कामकाजात दिसत नाहीये.

सरकारनामा ब्युरो

Mumbai : मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याबाबत याच अधिवेशनात श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. (Monsoon Session) विधानपरिषदेत उपस्थित प्रश्नाच उत्तर देताना उदय सामंत यांनी ही माहिती दिली होती. सोबतच अधिवेशनात श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचं लेखी आश्वासन उद्योग खात्याने दिलंय.

आता अधिवेशनाचे दोन दिवस बाकी असताना श्वेतपत्रिका कधी सादर केली जाणार? असा प्रश्न उपस्थित झालाय. (Udya Samant) कारण आजचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचा कामकाजाचा क्रम पाहिला तर आजही श्वेतपत्रिका संदर्भात (Monsoon Session) कुठलाही समावेश कामकाजात दिसत नाहीये.

राज्यातून इतर राज्यात गेलेल्या वेदांता फॉक्सकॉन, एअरबस यासारख्या मोठ्या प्रकल्पाबाबत ही श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. (Maharashtra) त्याशिवाय सफ्रॉन, बल्क ड्रग पार्क या प्रकल्पाबाबत सुद्धा या श्वेतपत्रिकेमध्ये विस्तृत माहिती सादर केली जाणार आहे.

खरंतर उद्योग राज्य बाहेर या सरकारच्या काळात गेले अशा प्रकारची टीका विरोधकांकडून केली जात असताना ही श्वेतपत्रिका एक प्रकारे त्याला उत्तर आहे असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र अजूनही या श्वेतपत्रिकेची प्रतीक्षा आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT