Shivsena 16 Mla Disqualification : सोळा आमदार अपात्रतेची सुनावणी कधी ? सुप्रीम कोर्टानं दीड महिना...

Supreme Court News update : मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
SC hearing MLA Disqualification LIVE
SC hearing MLA Disqualification LIVESarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी तब्बल दीड महिना लांबणीवर गेल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत देखील १८ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे

SC hearing MLA Disqualification LIVE
Maharashtra Governor Ramesh Bais: महाराष्ट्राचे राज्यपाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार ?

सोळा आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी याचिका ठाकरे गटाने दाखल केली होती. दोन दिवसांपूर्वी या याचिकेवर लगेचच सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. त्यानंतर आता या याचिकेची दखल घेत १८ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याचे निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.

SC hearing MLA Disqualification LIVE
Swabhimani Shetkari Saghtana: राजू शेट्टींचं टेन्शन वाढलं; अनेक शेतकरी नेते बीआरएसच्या गळाला..

सुप्रीम कोर्टाचा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला आहे. यामध्ये शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

हा निकाल ठराविक वेळेत देणं गरजेचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत ठाकरे गटाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com