Neelam Shirke, wife of Minister Uday Samant, filing her nomination for the Marathi Film Corporation election.  sarkarnama
महाराष्ट्र

Marathi Film Corporation Election : शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांची अभिनेत्री पत्नी निवडणुकीच्या मैदानात; चित्रपट महामंडळासाठी मोर्चे बांधणी! बिनविरोध करण्याच्या हालचाली

Uday Samant Neelam Shirke : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Rahul Gadkar

Neelam Shirke News : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक यंदाही यंदाही गाजण्याची चिन्हे आहेत. महामंडळ बचाव कृती समिती, मेघराज राजेभोसले यांचे समर्थ पॅनेल आणि आणखी एक किंवा दोन आघाड्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे.

निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याची चर्चा असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेता आनंद काळे,अभिनेत्री नीलम शिर्के, वर्षा उसगावकर, पार्श्वगायक आनंद शिंदे यांनी आज अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखलचा शेवटचा दिवस असल्याने येथील महामंडळाच्या मुख्य कार्यालयात गर्दी झाली होती.

दरम्यान, सोमवारी (ता. 25) अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरीक्षक रागिणी खडके काम पाहत आहेत.

पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेवेळी एकूण 22 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले होते, तर तीन विद्यमान संचालकांसह सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्यासह आजअखेर एकूण साठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.त्यामध्ये माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, राज काझी, अजित शिरोळे, बाबा लाड, विजय खोचीकर, चैत्राली डोंगरे, रणजित जाधव आदींचाही समावेश आहे.

17 जागा, निकाल 8 जूनला

एकूण सतरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सोमवारी (ता. 25) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 26 मे ते 28 मे या कालावधीत माघार तर २९ मे रोजी चिन्ह वाटप होईल. सात जूनला मतदान होणार असून, आठ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT