Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा फोडले. सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश केल्याने मागील काही काळापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना बॅकफूटवर असल्याचे चित्र होते.मात्र, उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. आता, पक्षाकडून 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची सुरुवात केल्याची दिसत आहे.
फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघासह राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख नेमत उद्धव ठाकरेंनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी तयार असल्यचा संदेश कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आत्तापासून 2029 साठी उमेदवार निवडणुची प्रक्रिया सुरू झाल्याची देखील चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीवरुण सरदेसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेच्या संपर्कप्रमुखपद सरदेसाई यांच्याकडे असणार आहे. तर, सुषमा अंधारे यांच्याकडे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुखपद देण्यात आले आहे.
वरुण सरदेसाई -कल्याण लोकसभा, भिवंडी लोकसभा
बबनराव थोरात -हिंगोली लोकसभा
सुषमा अंधारे -सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा
अरुण दुधवडकर -कोल्हापूर लोकसभा
गुरुनाथ खोत -मीरा-भाईंदर मनपा क्षेत्र, ओवळा-माजीवडा विधानसभा
संजय सावंत - बारामती लोकसभा
अशोक धात्रक -धुळे लोकसभा
गुलाबराव वाघ -रावेर लोकसभा
सुनील शिंदे - अहिल्यानगर लोकसभा, शिर्डी लोकसभा
मुकेश साळुंके -नंदुरबार लोकसभा
प्रदीप बोरकर -रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा
संजय मानाजी कदम -रायगड लोकसभा – पेण विधानसभा वगळून
प्रसाद भोईर -मावळ लोकसभा – पेण विधानसभासहित
आदित्य शिरोडकर -विधानसभा – ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ऐरोली, बेलापूर
विभास पोतनीस - पालघर लोकसभा
सचिन पडवळ -पुणे लोकसभा
किरण तावडे -शिरुर लोकसभा
उदय दळवी -सातारा लोकसभा
स्वप्नील पुंजिर -सांगली लोकसभा
महेंद्र इंदूलकर -हातकणंगले लोकसभा
आशीष चेंबूरकर -छत्रपती संभाजीनगर लोकसभा
सुनील वामन पाटील -जालना लोकसभा
सुनील काटमोरे -धाराशीव लोकसभा
किशोर पोतदार -नांदेड लोकसभा
प्रदीपकुमार खोपडे -परभणी लोकसभा
परमेश्वर सातपुते - लातूर लोकसभा
अशोक सकपाळ - बीड लोकसभा
नरेंद्र खेडेकर -बुलढाणा लोकसभा
नीलेश धुमाळ - अकोला लोकसभा
डॉ. किशोर ठाणेकर - अमरावती लोकसभा
दिलीप जाधव - यवतमाळ-वाशीम लोकसभा
सुधीर सूर्यवंशी - वर्धा लोकसभा
सतीश हरडे- नागपूर लोकसभा
सुरेश सावंत - रामटेक लोकसभा
महेश केदारी - गडचिरोली-चिमूर लोकसभा
प्रशांत कदम - चंद्रपूर लोकसभा
राजू पाटील - भंडारा-गोंदिया लोकसभा
रवींद्र मिर्लेकर - नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा
नितीन बानुगडे-पाटील - सातारा, सांगली जिल्हे
नितीन देशमुख – बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्हे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.