MOTN Survey : 'काॅक्रोच'च्या आंदोलनाचा काँग्रेसला फायदा, भाजपला धक्का, सर्व्हेतील आकडेवारी समोर

Cockroach Janata Party Congress BJP : आत्ता देशात निवडणुका झाल्यानंतर कोणाचे सरकार येईल. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या सर्व्हेची आकडेवारी समोर आली आहे.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Survey News : दिल्लीमधील जंतरमंतरवर काॅक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे. इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातात आत्ता निवडणूक झाली तर काय परिस्थिती असेल याची आकडेवारी मांडली आहे.

या सर्व्हेनुसार पुन्हा एनडीएची सत्ता येताना दिसत आहे. मात्र, या पूर्वीच्या सर्व्हेंमध्ये ज्या प्रकारे भाजपला पाठींबा मिळत होता तसा मिळतानाच दिसत नाही. ते बहुमताच्या आकड्यापार जात असले तरी पूर्वीच्या सर्व्हेत त्यांना मिळालेल्या आकड्यांमध्ये घट होत आहे.

जानेवारीमध्ये एनडीएला 252 जागा मिळण्याता अंदाज होता. मात्र, सहा महिन्यात त्यांच्या 26 जागा घटताना दिसत आहे. भाजपच्या 261 जागा मिळण्याचा अंदाज असून काँग्रेसच्या 26 जागा वाढत असल्याचे या सर्व्हेमध्ये दिसत आहे. त्यामुळे काॅक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाचा फायदा काँग्रेसला होत असल्याची चर्चा आहे. यापूर्वीच्या सर्व्हेत काँग्रेसला 80 जागा मिळण्याचा अंदाज होता. तो आकडा 106 वर जात आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Election Survey : निवडणुकीपूर्वीच्या सर्व्हेतील आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन; लोकसभेसाठी धोक्याची घंटा, उत्तर प्रदेशात...

काॅक्रोच निवडणुकीत उतरली तर...

काॅक्रोज जनता पार्टी निवडणुकीच्या मैदानात उतरली तर त्यांना 33 टक्के लोक मतदान करण्यास तयार असल्याचे या सर्व्हेमध्ये दिसत आहे. तर, 43 टक्के लोकांनी मतदान करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसचे 24 टक्के लोकांनी अजून आपले मत ठरवले नसल्याचे सांगितले.

मोदींची लोकप्रियता कायम

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हाच सर्वात लोकप्रिय चेहरा असल्याचे सर्व्हेमधून दिसत आहे. मोदींना तब्बल 49 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर, दुसऱ्या स्थानावर राहुल गांधी आहेत. त्याना 27 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या स्थानावर तमिळनाडूचे मुख्यमत्री विजय यांना पसंती मिळाली आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com