MLAs absent in legislative council session: विधान परिषदेमधून उद्धव ठाकरे हे निवृत्त झाले आहेत. त्यांनी पुन्हा निवडणूक लढली नाही. दरम्यान, विधीमंडळाच्या मागील चार अधिवेशनाला आणि बैठकांना विधान परिषदेमधील आमदारांची उपस्थिती किती होती याची आकडेवारी समोर आली आहे.
या आकडेवारीनुसार मागील चार अधिवेशनात उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के नोंदवली गेली आहे. तर, दोन आमदार हे मागील तीन अधिवेशनात एकदाही उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे.
विधान परिषदमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार असलेल्या भावना गवळी या एकदाही अधिवेशनाला उपस्थित नसल्याने समोर आले आहे. त्यांची उपस्थिती शून्य टक्के आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे निंबाळकर यांची देखील उपस्थिती शून्य टक्के आहे.
मागील तीन अधिवेशनात ते एकदाही हजर नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या विषयी त्यांना एका मराठी वृत्तवाहिनीने विचारले असता प्रकृती ठीक नसल्याने आपण उपस्थित नसल्याने त्यांनी सांगितले.
विधान परिषदेमध्ये तब्बल 100 टक्के उपस्थिती लावणारे देखील आमदार आहेत. त्यामध्ये नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. ते नुकतेच विधान परिषदेमधून निवृत्त झाले आहेत. मात्र मागील तीन अधिवेशनात त्यांची 100 टक्के हजेरी होती.
काँग्रेस आमदार राजेश राठोड तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांची देखील 100 टक्के हजेरी आहे. तसेच शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकार आडबाले यांचे देखील १०० टक्के उपस्थिती आहे.
उद्धव ठाकरे हे 2020 मध्ये विधान परिषदेचे आमदार झाले होते. त्यावेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होते. दरम्यान, त्यांनी 133 बैठकांपैकी 42 बैठकांना हजेरी लावली. त्यामुळे त्यांची उपस्थिती 31.58 टक्के होते आहे. त्यांच्या कमी उपस्थितीविषयी बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे हे एक दिवस आले तरी ते चार दिवसांचे काम करतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.