Nashik ZP No Vehicle Day : पीएम मोदींच्या आवाहनाला नाशिक झेडपी'चा प्रतिसाद, दर सोमवारी आता 'नो व्हेइकल डे'

Nashik ZP No Vehicle Day : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे 15 हजार कर्मचारी दर सोमवारी करणार सार्वजनिक वाहनाने प्रवास.
Nashik ZP
Nashik ZP No Vehicle DaySarkarnama
Published on
Updated on

Nashik ZP News : पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना इंधनाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मोदींच्या या आवाहनाला देशभरात वेगवेगळ्या पातळीवर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नाशिक जिल्हापरिषदेने देखील मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या 19 कलमी उपाययोजनांची जिल्हा परिषद प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हापरिषदेत आता दर सोमवारी 'नो व्हेइकल डे' पाळला जाणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दर सोमवारी कार्यालयात येण्यासाठी व परत जाण्यासाठी स्वतःच्या खासगी वाहनांचा वापर बंद करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असे निर्देश प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संगमनेरे यांनी दिले आहेत. (Nashik News)

Nashik ZP
Nashik ZP : लाचखोर वैशाली ठाकरेंनी तब्बल 100 फाईल्स कपाटात लपवून ठेवल्या; चौकशीत सगळं समोर.. आता कारवाईची टांगती तलवार

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह 15 पंचायत समिती अंतर्गत 15 हजारांहून अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत कार्यरत सर्व विभागप्रमुख, अधिकारी तसेच अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना लेखी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Nashik ZP
Nashik ZP News : पैसै मी एकट्याने नाही खाल्ले... ग्रामविकास अधिकाऱ्याला CEO पवारांनी दणका दिला.. पण साखळी मोडून काढणार का?

राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत जिल्हा परिषद नाशिक प्रशासनाने या उपाययोजनांची जिल्हाभर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. कर्मचारी सार्वजनिक वाहनाने म्हणजे एसटी, शहर बसने आल्यास या उपक्रमातून इंधनाची मोठी बचत होईल. याशिवाय वाहतूक कोंडी टळेल तसेच प्रदूषणात घट होऊन शासकीय अधिकारी स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याचे पाहून समाजात सकारात्मक संदेश जाईल अशी आशा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com