Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : अधिवेशन वादळी होणार! शेवटच्या दिवशी येणारे उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी 15 मिनिटे आधी हजर

Assembly Session Uddhav Thackeray : गेल्या काही अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे हे शेवटच्या आठवड्यात हजेरी लावायचे. मात्र, या अधिवेशनात पहिल्याचा दिवशी तेही 15 मिनिटे आधी आल्याने हे अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित.

Roshan More

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाने प्रचंड काॅन्फिडन्स वाढलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात आले. याचा अर्थ या अधिवेशनात विरोधक ठाकरे, पवार आणि काँग्रेस नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबतीला असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार घेरण्याची एकही संधी सोडणार नाहीत. गेल्या काही अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे हे शेवटच्या आठवड्यात हजेरी लावायचे. मात्र, या अधिवेशनात पहिल्याचा दिवशी तेही 15 मिनिटे आधी आल्याने हे अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित मानले जात आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबादारी असताना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसा पासून हजर असायचे. मात्र, सत्तांतरानंतर ते काही गेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे हजेरी लावल्याचे दिसले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. ठाकरेंचे 9 तर, शरद पवारांचे आठ आणि काँग्रेसचे 13 असे 30 खासदार जिंकले तर, महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. या निकालाने ठाकरेंना प्रचंड बळ आल्याचे दिसत आहे.

लोकसभेनंतरचे हे पहिले अधिवेशन असले तरी सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीचे हे शेवटचे अधिवेशन आहे.अशातच उद्धव ठाकरे हे अधिवेशनात येणार का? कुठल्या दिवशी येणार? याची उत्सुकता असताचा ठाकरे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी विधानभवानच्या आवारात आले.

त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी काँग्रेसचे Congress नेते देखील त्यांच्यासोबत होते. टीव्ही कॅमेऱ्याला ठाकरेंनी हात केला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आत्मविश्वास दिसत होता. त्यानंतर ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरून आता गेले.

उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आल्याने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विरोधकांची म्हणजे महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न होणार आहे. ठाकरेंच्या हल्ल्याला शिंदे-फडणवीस-पवार कसे प्रत्युत्तर देतात याचीही उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT