Sanjay Raut: उद्धव ठाकरे हेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; राऊतांच्या विधानामुळे आघाडीत बिघाडी?

Sanjay Raut demand to declare uddhav thackeray as cm candidate: लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहुनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाहीत.
Sanjay Raut demand to declare uddhav thackeray as cm candidate
Sanjay Raut demand to declare uddhav thackeray as cm candidateSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न विचारला जात असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मविआचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असे सांगून टाकले. राऊतांच्या या विधानामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम महाराष्ट्रानं पाहिलं आहे. तीनही पक्ष एकत्र लढले असले तरी लोकसभा निवडणुकीत आघाडी झालेलं मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहुनही झाले आहे, असे राऊत यांनी सांगितले.

"बिन चेहऱ्याचं सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल." असे सांगत राऊतांनी (Sanjay Raut) उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे अप्रत्यक्षपणे सूचवले.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव खासदार संजय राऊत यांनी पुढे रेटले आहे. बिन चेहऱ्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मतदान मागणे हे धोक्याचे असल्याचे राऊतांचे म्हणणे आहे.

Sanjay Raut demand to declare uddhav thackeray as cm candidate
Sanjay Singh: आपचे खासदार संजय सिंह तब्बल वर्षभरानंतर संसदेत जाणार; उपराष्ट्रपतींचे मानले आभार!

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार हा धोका आहे. या महाराष्ट्र आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे काम पाहिले आहे. लोकसभेला जे यश मिळाले, ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच, असा दावा राऊतांनी केला. राऊतांच्या या विधानावरुन आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री पदासाठी आताच महाविकास आघाडीतील कुठल्याही नेत्यांनी स्वारस्य दाखवू नये. आम्ही सत्तेवर पाहिजे हे स्वारस्य असले पाहिजे. निवडून आलेले आमदार त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतली. त्यावर आताच भाष्य करणे टाळले पाहिजे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com