Sanja Raut Uddhav Thackeray In Malegaon : Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : ठाकरेंच्या सभेचे उर्दू भाषेत बॅनर ; जावेद अख्तर, गुलजारांचे उदाहरण ते बाळासाहेबांना उत्तर...

Uddhav Thackeray In Malegaon : "याचं उत्तर त्यांना कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना द्यावे लागेल.."

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या होम ग्राऊंडवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यानंतर आता नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यामध्ये ठाकरेंची सभा पार पडत आहे. या सभेसाठी मराठी सोबतच उर्दू भाषेतून बॅनर लावण्यात आले आहेत. यावरूनच शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून ठाकरे शिवसेना गटावर टीका करण्यात येत होती.

याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, "उर्दू या देशातली भाषा नाही का? जावेद अख्तर यांचं काल कौतुक झालं. पण पाकीस्तानात जाऊन ठाम भूमिका मांडणारी भाषा उर्दू आहे. जावेद अख्तर, गुलजार यांचं लेखन आजही उर्दूत होत आहे."

संजय राऊत यांच्या या भूमिकेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, "आता त्यांना हे भूषणावह वाटतं का? अली, जनाब वगैरे जे काही आहे, हे भूषणावह वाटतं का ? त्यांनाच विचारा. उर्दू ही एक भाषा आहे. त्या भाषेमध्ये कोणी काही म्हंटलं तर हरकत नाही."

"आमचं म्हणणं एवढंच आहे. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. लांगूनचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन लांगुनचालन करत असतील तर, याचं उत्तर त्यांना कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना द्यावे लागेल," असे ही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT