Priyanka Gandhi News : वडिलांची आठवण सांगताना प्रियांका गांधी भावूक; जे देशासाठी...

Congress-BJP Politics | पण आज एका माणसाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार कामाला लागले आहे.
Priyanka Gandhi News
Priyanka Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress-BJP Politics | ही गोष्ट 1991ची. भारतीय सैन्याच्या गाडीत माझ्या वडीलांची अंत्ययात्रा निघाली होती. राहुलने गाडीतून खाली उतरण्याचा हट्ट केला. आईने त्यांना अडवलं. पण शेवटी राहुल गाडीतून उतरले आणि वडिलांच्या अंत्य यात्रेसोबत चालायला लागले. तिथून काही अंतरावर वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. असे सांगत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिल्लीतील राजघाटावर त्या बोलत होत्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. लोकसभेच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने आज राजघाटावर संकल्प सत्याग्रहाचे आयोजन केले आहे.यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.'' जे देशासाठी शहीद झाले, अशा शहीद वडिलांचा संसदेत अपमान झाला. शहीद पुत्राला देशद्रोही, मीर जाफर म्हटलं गेलं. त्यांनी माझ्या शहीद वडिलांचा अपमान केला. संसदेत माझ्या आईचा अपमान होत आहे. एक मुख्यमंत्री म्हणतात की, राहुल गांधींना त्यांचे वडील कोण आहेत हे माहीत नाही. पण तेव्हा या लोकांवर कारवाई होत नाही.'' अशी टिकाही प्रियांका गांधींनी केली आहे.

Priyanka Gandhi News
Congress-BJP Politics : राहुल गांधींच्या जागी वायनाडमधून 'ही' व्यक्ती लढवणार निवडणूक?

पण आज एका माणसाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार का उभे आहे? हे खुप वाईट होत आहे. कित्येक लोकांनी या देशासाठी प्राण दिले आहेत. पण आज एका व्यक्तीला वाचवण्यासाठी संपूर्ण केंद्र सरकार कामाला लागले आहे. माझी विनंती आहे. उशीर होण्याआधी आताच डोळे उघडून पाहा. मलाही तुरुंगात मध्ये टाका, माझ्यावर खटला दाखल करा, पण या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. अंहकारी आहेत. या देशाची परंपरा आहे, हिंदू धर्माची पंरपरा आहे, अहंकारी राजाचा पराभव निश्चित आहे.

"या देशाची लोकशाहीसाठी माझ्या कुटुंबाने रक्त सांडले आहे. आमचा अपमान करून, एजन्सीचे छापे टाकून आम्ही घाबरुन जाऊ असं ज्यांना वाटत असेल तर ते त्यांचे चुकीचे विचार आहेत. आम्ही घाबरत नाही.

या देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही अधिक भक्कमपणे लढू. आजही काँग्रेस पक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. ज्याने सर्व संपत्ती लढवली आहे. आज संपूर्ण देशाची संपत्ती एकाच व्यक्तीच्या ताब्यात दिली जात आहे.ही देशाची संपत्ती आहे. ही राहुल गांधींची संपत्ती नाही. असंही प्रियांका गांधींनी म्हटलं आहे.

पण आज एका माणसाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार का उभे आहे? हे खुप वाईट होत आहे. कित्येक लोकांनी या देशासाठी प्राण दिले आहेत. पण आज एका व्यक्तीला वाचवण्यासाठी संपूर्ण केंद्र सरकार कामाला लागले आहे. माझी विनंती आहे. उशीर होण्याआधी आताच डोळे उघडून पाहा. मलाही तुरुंगात मध्ये टाका, माझ्यावर खटला दाखल करा, पण या देशाचे पंतप्रधान भित्रे आहेत. अंहकारी आहेत. या देशाची परंपरा आहे, हिंदू धर्माची पंरपरा आहे, अहंकारी राजाचा पराभव निश्चित आहे.

"या देशाची लोकशाहीसाठी माझ्या कुटुंबाने रक्त सांडले आहे. आम्ही घाबरत नाही.या देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही अधिक भक्कमपणे लढू. आजही काँग्रेस पक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. पण आज संपूर्ण देशाची संपत्ती एकाच व्यक्तीच्या ताब्यात दिला जात आहे. ही देशाची संपत्ती आहे. ही राहुल गांधींची संपत्ती नाही. असंही प्रियांका गांधींनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com