Aaditya Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Aaditya Thackeray VS Narayan Rane : राणे-ठाकरे समर्थक भिडताच, उद्धव ठाकरेंनी कोणाला केला फोन...

Pradeep Pendhare

Mumbai News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राण समर्थकांमध्ये चांगलाच राडा झाला. भाजप नेते नारायण राणे आणि नीलेश राणे पिता-पुत्रांने आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं होतं. दोन्ही बाजूने कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. दगडफेक, हाणामारी, शिवीगाळ, धरपकड, फेकाफेकी, असं बरच काही झालं.

या सर्व राड्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेंना संपर्क केला. या फोनवरील संभाषणाची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. "उद्धवसाहेबांनी शिवसैनिकाला फोन केला होता. हिंमत दिली. त्यामुळेच लढलो आहे", अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावर दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्याजवळ कोसळला. या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते गेले होते. तिथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पूर्वीचे शिवसेनेचे नेते आणि आताचे भाजप (BJP) नेते खासदार नारायण राणे आणि नीलेश राणे यांनी टार्गेट केले. यातून राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये चांगलाच राडा झाला. दगडफेक, हाणामारी, शिवीगाळ, धरपकड, फेकाफेकी, असं बरच काही झालं. आदित्य ठाकरेंना घेरण्याचाच हा प्रकार होता. या राड्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना संपर्क केला. यात ठाकरे पिता-पुत्रांमध्ये नेमका कोणत्या मुद्यावर संवाद झाला, याची माहिती स्वतः आदित्य ठाकरेंनी दिली.

उद्धवसाहेबांचा (Uddhav Thackeray) फोन आला होता. त्यांनी हिंमत दिली. सर्व माहिती घेऊन ये. भाजप किती भ्रष्टाचार करत आहे, ते देशाला दाखवायचा आहे. भाजप आता भ्रष्टाचारी पक्ष झाला आहे, सांगायचे आहे. त्यामुळे त्यांनी हिंमत दिली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. हा फोन काळजीपोटी देखील केला असेल असे विचारताच, उद्धवसाहेबांनी हिंमत देण्यासाठी फोन केला होता. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही लढत असतो, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

राडा घालणाऱ्यांचा 'डीएनए' भाजपचा

आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. कायदा-सु्व्यवस्थेची परिस्थितीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप केला. छत्रपतींच्या किल्ल्यावर हा राडा घालणाऱ्यांचा 'डीएनए' भाजपचा आहे. गृहमंत्र्यांना बोलायला वेळ नाही. बदलापूर अत्याचार घटनेत देखील बोलले नाही. ते राजकारणात व्यग्र आहेत, असा घाणाघात देखील आदित्य ठाकरेंनी केला.

राड्याला 'बालबुद्धी' जबाबदार

"त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे, तो भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे पडला आहे. मिंधे यांच्या खोक्यांच्या कारभारामुळे पडला आहे. हा पुतळा उभाणारा ठेकेदार कोणाजवळचा आहे. कोणाला खोके मिळाले, धोके मिळाले, हा पसार कसा झाला, हे जनतेसमोर आले पाहिजे", अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. दौरा नियोजित असून, हा प्रकार घडला, याला जबाबदार कोण आहे, यावर आदित्य ठाकरेंनी 'बालबुद्धी' आहे, ते लोकं जबाबदार आहे, असा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT