Mumbai news : दिल्लीतील जंतर मंतरवर सुरु असलेल्या अभिजित दिपके यांच्या सीजेपी पक्षाच्या आंदोलनाला ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठींबा दर्शवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतच आपचे नेते व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर सीजेपीच्या सुरु असलेल्या आंदोलनाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून देखील चर्चा केली.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली असून महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावली आहे.
दिल्लीत गेल्या काही दिवसापासून अभिजित दिपके यांच्या सीजेपी पक्षाकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला सर्वस्थरातून पाठींबा मिळत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही? असा सवाल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतूनच विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींचे भेट घेत व फोनवरून चर्चा करीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे. त्यामुळे आंदोलन येत्या काळात सुरूच राहणार आहे. ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे राज्यातील नेत्यासोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास महाविकास आघाडीच्या नेत्याची बैठक मुंबईत बोलावली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यभरात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष विद्यार्थी प्रश्नी एकत्रित येणार आहेत. या बैठकीत राज्यभरात येत्या काळात करण्यात येणाऱ्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. येत्या काळात राज्यातही आक्रमकपणे आंदोलन करून दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला जाणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.