Milind Narvekar uddhav Thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Milind Narvekar : उद्धव ठाकरेंच्या 'राइट हॅण्ड'ची संपत्ती किती? चांदीपासून हिऱ्यापर्यंत दागिने...

Milind Narvekar Wealth : नार्वेकर दाम्पत्याकडे हिरे, सोने, चांदचे दागिने आहे. सोन्याचे दागिने 355.94 ग्रामाचे भाव 24 लाख 67 हजार 981 रुपये आहे. तर, चांदीची 12.56 किलोग्रामाचे 9 लाख 74 हजार 656 रुपयांचे दागिने आहेत.

Roshan More

Milind Narvekar News : उद्धव ठाकरेंची सावली म्हणून परिचित असलेले शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेला ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी दिल्याने नार्वेकर यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली आहे.

नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नार्वेकरांच्या संपत्ती किती? याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. नार्वेकर 10 वी पास असून त्यांचेकडे रोख रक्कम 45 हजार रुपये, तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे. नार्वेकर यांच्या बँक अकाउंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रुपये तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रुपये आहेत.

हिरे, चांदीचे दागिने

नार्वेकर दाम्पत्याकडे हिरे, सोने, चांदचे दागिने आहे. सोन्याचे दागिने 355.94 ग्रामाचे भाव 24 लाख 67 हजार 981 रुपये आहे. तर, चांदीची 12.56 किलोग्रामाचे 9 लाख 74 हजार 656 रुपयांचे दागिने आहेत. तर हिऱ्याचे 36 लाख 85 हजार 552 रुपयांचे दागिने आहेत. एकूण दागिन्यांची किंमत 71 लाख 28 हजार 189 रुपये आहे. तर, पत्नीकडे 29 लाख 26 हजार 21 रुपयांचे सोने, 33 लाख 49 हजार 623 रुपयांचे हिरे असे एकुण 67 लाख 61 हजार 420 रुपय किंमतीचे दागिने आहेत.

नार्वेकरांकडे किती जमीन?

5 ऑगस्ट 2008 रोजी खरेदी केलेली बीड जिल्ह्यातील बाणेवाडी गावात 0.19 एकर जमीन, बेंगलोर येथे पत्नीच्या नावावर 2325 स्क्वेअर फुट जमीन. मुंबईतील मालाड आणि बोरिवली येथे 1000 स्क्वेअर फुटाचं घर पत्नीच्या नावावर अलिबाग येथे एक फार्म हाऊस नावावर आहे. मिलिंद नार्वेकर Milind Narvekar मालमत्तेची एकूण रक्कम 4 कोटी 17 लाख 63 हजार 323, पत्नीच्या मालमत्तेची 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 रुपये आहे.

- बॉण्ड्स किंवा म्युचल फंड मध्ये गुंतवणूक 50 हजार, तर पत्नीची 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये

- पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये गुंतवणूक 3 लाख 68 हजार 729 रुपये तर पत्नीचे 67 लाख 88 हजार 558

- वैयक्तिक कर्ज 26 लाख 38 हजार 160 रुपये कर्ज, तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये कर्ज

- बँक लोन स्वतःवर 1 कोटी 54 लाख 81 हजार 989, पत्नीवर कर्ज 38 लाख 94 हजार 807 रुपये

- श्री बालाजी कॉम. एलएलपी कंपनी आहे. त्यात 50 टक्के शेयर्स त्यांचे तर पत्नीचे 50 टक्के शेयर्स आहेत. त्यामध्ये त्यांची स्वतःची एकूण रक्कम 10 कोटी 11 लाख 28 हजार 152 तर, पत्नीची एकूण रक्कम 31 कोटी 25 लाख 33 हजार 560 रुपये आहे.

- नार्वेकर यांचे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल, अंबुजा सिमेंट, अशोक लेयलँड, एसीयन पेंट्स, IDBI बँक, ICCI बँक आणि इतर कंपन्यामध्ये शेयर्स खरेदी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT