Uddhav Thackeray In Malegaon : Shivsena Thackeray Group : Sarkarnam
महाराष्ट्र

Uddhav Thackeray In Malegaon : उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावमध्ये धडाडणार : कुणाकुणाचा घेणार समाचार?

Shivsena Thackeray Group : 'मालेगावच्या लोकांवर विश्वास नाही का?' दादा भुसेंनी सभे आधीच डिवचलं..

सरकारनामा ब्यूरों

Uddhav Thackeray In Malegaon : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या होम ग्राऊंडवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यानंतर आता नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यामध्ये ठाकरेंची सभा पार पडणार आहे. मागच्या दोन दिवसात राजकीय वातावरण तापलं असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

मालेगाव येथील मजला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही सभा पार पडणार आहे. ही सभा संध्याकाळी ७.०० वाजता पार पडणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ आणि एक लाख लोक मावतील एवढी आसनव्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.दोन दिवसांपासून संजय राऊत मालेगावमध्ये तळ ठोकून आहेत. याकडे उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.

सभेपूर्वी दादा भुसेंची प्रतिक्रिया काय?

"लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा मालेगाववर, इथल्या लोकांवर विश्वास नसेल. म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोकांना जमवत आहेत. मालेगावातील सर्व मुस्लीम बांधव आम्हाला ओळखतात," असे भुसे म्हणाले.

"जो योग्य वाटतं तो निर्णय मालेगावची जनता घेईल. ठाकरे गटाच्या आजच्या सभेत पक्ष बदलून आलेले अनेक लोक असतील. बाहेरून लोक आणून गर्दी केली जाते. याचाच अर्थ यांचा मालेगावच्या लोकांवर विश्वास नाही," अशी टीका दादा भुसे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT