Mumbai News : राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सभागृहात कॅगचा अहवाल मांडला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिपण्णी सुरू झाली. कॅगकडून मुंबई मनपाच्या तब्बल १२ हजार कोटी रूपयांच्या कामाचा आढावा घेण्यात आलाय. यात कँगकडून अनेक मुद्द्यांवर मुंबई मनपावर ताशेरे ओढण्यात आलंय.
यावेळी बोलताना फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना ठाकरे गटाला सूचक इशारा दिला आहे. “हा अहवाल ट्रेलर आहे.कारण लिमिटेड 12 हजार कोटींच्या कामांची चौकशी या अहवालात केलीय. पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी निघतील हे सांगता येत नाही”, असा इशाराच फडणवीसांनी यावेळी दिला.
मुंबई मनपातील दि. 28 नोव्हेंबर 2019 ते दि. 31 ऑक्टोबर 2022 या कालखंडात म्हणजेच, कोरोना साथीच्या काळात विविध व्यवस्थापनावर खर्च करण्यात आलेल्या एकूण नऊ विभागांचं ऑडिट करण्यात आले आहे. यात व्यवहार करताना पारदर्शकतेचा अभाव, नियोजन अभाव, निधी खर्च करण्यात हलगर्जीपणा इत्यादी ठपका कॅगने ठेवला आहे.
कॅगच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
मुंबई मनपाची 2 विभागांची एकूण 20 कामे निविदा न काढताच बहाल केली गेली. 64 काँन्ट्रँक्टर्स आणि मुंबई मनपा यांचा करार झाला नाही, यामुळे तब्बल 4 हजार 755 कोटी रूपयांच्या कामांची अंमल झालेली नाही.पालिकेच्या 3 विभागांमध्ये एकूण 13 कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटर करण्यासाठी नियुक्ती केली गेली नाही.
पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात 159 कोटीं रूपयाचं काँन्ट्रँक्ट टेंडर न काढताच आधीच्याच काँन्ट्रँक्टर्सला बहाल केले गेले.मान्यता नसतानाही ब्रिज विभागात अतिरिक्त कामे सुपूर्द करण्यात आली. रस्ते- वाहतूक विभाग यामध्ये एकूण 52 पैकी 51 कामे कोणताही सर्व्हे न करताच निवडली गेली, असा ताशेरे कॅगने ओढले आहेत.
‘ट्रेलर संपेपर्यंत हे सरकार कोसळेल’, आदित्य ठाकरेंची टीका :
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅगच्या रिपोर्टच्या माध्यमातून राजकारण होत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. “ट्रेलर संपेपर्यंत हे सरकार कोसळेल. मुंबईवर यांचा राग आहे, त्यामुळेच असे अहवाल मांडण्यात आले आहे. माझी मागणी आहे की, मुंबईप्रमाणेच नाशिक, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या पालिकांचा कॅगचा अहवाल तुमच्यात हिंमत असेल तर आणावा.
त्याची चौकशी करण्यात यावी. मात्र असे ते करणार नाहीत. यांच्यात हिंमतच नाही. मुंबई मनपाला बदनाम करण्यासाठी आणि निवडणुकांसाठी हे सगळं सुरु आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांचं नाव न घेताच केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.