Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
खासदार फुटणार चर्चेमुळे उद्धव ठाकरे खासदारांवर नाराज होते. ते म्हणाले, मला एनसीपीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे. आणि लढायचं नसेल तर तसं सांगा मी थांबतो.
त्यातच राज्यसभेची शिवसेनेची हक्काची जागा होती मात्र ती जागा शरद पवारांना सोडल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी बैठकीत आपली नाराजी बोलून दाखवली. शरद पवारांना राज्यसभा दिली म्हणून प्रियांका चतुर्वेदींनी संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली तसेच त्या बैठकीतून उठून गेल्या.
खासदारांनी आपल्या समस्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा परिषद निवडणूक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्षातील मोठ्या नेत्यांकडून पाठबळ मिळाले नाही. उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेमुळे मुंबईत अडकून पडले होते.
मात्र, आदित्य ठाकरे आणि इतर मोठ्या नेत्यांनी मुंबईबाहेर पडायला हवे होते, मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरावं अशी विनंती खासदारांनी केली. त्यामुळे आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.