Pratap Jadahv-Sanjay Raut-Uddhav Thackeray News Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना कुंभमेळ्यात जाऊन पाप धुण्याची गरज! प्रताप जाधवांचा टोला

Uddhav Thackeray, Sanjay Raut Should Go to the Maha Kumbh and Wash Away Their Sins, Minister Pratap Jadhav's Criticism : आत्तापर्यंत पोलीस संरक्षण होते, पण पोलीस आमच्यासोबत कधीच पोचत नव्हते, आमच्या गाडीची स्पीड आणि पोलिसांच्या गाडीची स्पीड याची तुलना होऊ शकत नाही, असे सांगत नाराजीच्या चर्चा निरर्थक

Jagdish Pansare

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना महाकुंभमेळ्यात जाऊन पाप धुण्याची गरज असल्याचा टोला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लगावला. शिंदे गटाच्या आमदारांचे पोलीस संरक्षण काढल्याने नाराजी नाही, असा दावाही जाधव यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी कितीही स्नान केले तरी यांची पापे धुतली जाणार नाहीत, चाळीस आमदार देशद्रोही आहेत, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यावर विचारलेल्या प्रश्‍नावर प्रताप जाधव यांनी पलटवार केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणाची हे ठरविले आहे. त्यामुळे आता कोण काय बोलतो? सकाळीच कोणाचा भोंगा सुरू होतो? याला अर्थ नाही.

आमच्यावर टीका करण्यापेक्षा (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनाच महाकुंभमेळ्यात जाऊन पाप धुण्याची गरज आहे, असा चिमटा जाधव यांनी काढला. शिंदे गटाच्या आमदारांचे पोलीस संरक्षण काढल्यावरून नाराजी नाही. आत्तापर्यंत पोलीस संरक्षण होते, पण पोलीस आमच्यासोबत कधीच पोचत नव्हते, आमच्या गाडीची स्पीड आणि पोलिसांच्या गाडीची स्पीड याची तुलना होऊ शकत नाही, असे सांगत नाराजीच्या चर्चा निरर्थक असल्याचे जाधव यांनी सांगितले.

कॅन्सरवर लवकरच लस

आयुष्य मंत्रालयावर ‘कोण बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात प्रश्‍न करण्यात आला. त्यामुळे आयुष्य मंत्रालय आता चर्चेत आले, असाही दावा जाधव यांनी केला. केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये कृषी, आरोग्य मंत्रालयासाठी भरीव निधी दिला आहे. कॅन्सरवरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असून, लवकरच 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती जाधव यांनी दिली.

दरम्यान, प्रताप जाधव यांच्या पत्रकार परिषदेला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते, पण शिंदे गटाचा शहरातील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ पत्रकार परिषद संपल्यानंतर म्हणजेच दोन तास उशिराने आले. त्यामुळे पत्रकार परिषद भाजपने हायजॅक केल्याची चर्चा यावेळी होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT