Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 'कळमनुरी'चे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश आज प्रवेश करणार आहेत.
टारफे यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. हिंगोलीमधून या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे मुंबईकडे रवाना झाला आहेत.
संतोष टारफे यांच्या या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकद वाढणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा पक्षाला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
टारफे यांच्यासह एस पी राठोड,रमेश जाधव, सखाराम उबाळे , दुर्गे पाटील यांच्या सह शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी टरफे यांचा विधानसभेला पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी ज्या सातवांकडून पराभव पत्काराला त्यांच्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता दोन वर्षापू्र्वी त्यांना संतोष बांगर यांनी टरफे यांचा पराभव केला होता. बांगर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. आता त्याच पक्षात टरफे प्रवेश करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.