Dasara Melava: '2019 मध्ये महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, हीच खरी व्होटचोरी...'; एकनाथ शिंदेंचा जिव्हारी लागणारा बाण

Shivsena Dasara Melava 2026: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यातून राज्यावर असलेलं दुष्काळांचं संकट, हवालदिल शेतकरी, सरकारची आर्थिक मदत यावर भाष्य केलं. तर दुसरीकडे काँग्रेस, विरोधकांची इंडिया आघाडी, माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: दसरा सणानिमित्तानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे अनुक्रमे शिवाजी पार्क आणि गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये घेण्यात आला. या दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेस्को सेंटरमधून शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. तसेच त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. तसेच राज्यासह देशभरात विरोधकांनी उचलून धरण्यात आलेल्या व्होट चोरीवरुन ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यातून राज्यावर असलेलं दुष्काळांचं संकट, हवालदिल शेतकरी, सरकारची आर्थिक मदत यावर भाष्य केलं. तर दुसरीकडे काँग्रेस, विरोधकांची इंडिया आघाडी, माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

ते म्हणाले, विरोधकांसह उद्धव ठाकरे हे सध्या विविध आंदोलनं,मोर्चे काढतानाच 'व्होटचोरी' (मतचोरी ) झाल्याचा आरोप करताना दिसून येत आहेत. मात्र,2019 मध्ये महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हीच राज्यातील सर्वात मोठी व्होटचोरी होती अशी खोचक टीका शिंदेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेकडून नेहमीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गद्दार म्हणून हिणवलं जातं. आता याच टीकेला शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही म्हणता न्यायाधीश, निवडणूक आयुक्तांच्या निवडणुका झाल्या पाहिजे. परवा तुम्ही म्हणताल की, महापालिकेच्या आयुक्तांच्याही निवडणुका झाल्या पाहिजे. अरे, तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुम्ही कुठं निवडून आलात, मागच्या दारानं मुख्यमंत्री झालात असा टोलाही त्यांनी लगावला.

Eknath Shinde
Sanjay Raut: संजय राऊतांनी 'रिजीम' बदलण्याचा केला पुनरुच्चार; "PM मोदी पायउतार होणार", या भाकितासह थेट तारीखचं सांगितली

एकनाथ शिंदे म्हणाले,या महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात. व्होटचोरीची भाषा तुम्ही करता, खरी व्होटचोरी तर 2019 मध्ये झाली. राज्यातील जनतेनं शिवसेना-भाजप युतीला मतदान केलं. आणि तुम्ही महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं. हा मतदारांसोबतचा विश्वासघात होता. त्यामुळे खरी गद्दारी आम्ही केली नसून 2019 मध्ये भाजप सोबतची युती मोडून महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करणाऱ्यांनी जनतेच्या मतांशी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सध्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे. ही वेळ शेतकऱ्यांसाठी धावून जायची आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी त्यांचं दु:ख समजू शकतो. पण शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी भाषणात केला. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास गेला. शिवसेनेचं उपरणं खांद्यावर,शिवसैनिका आमचा शेतकऱ्यांच्या बांधावर असंही त्यांनी सांगितलं.आम्ही भाषण देणारे नाही. तर राशन देणारे असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Eknath Shinde
Tiger Shroff: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; टार्गेटवर होता दुसराच अभिनेता पण...; चौकशीतून माहिती आली समोर

उपमुख्यमंंत्री शिंदे यांनी महायुती सरकारनं दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शिक्षण असेल, कर्जवसुली, वीजबिलं, चारा, पाणी, 12 सवलती देत असल्याची माहिती भाषणातून दिली. शेतकऱ्यांना तातडीनं 5 हजारांची मदत ही आहे, तसेच दुष्काळाची मदतही मिळणार आहे. संकटात शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं आहे. आमच्या सरकारनं एनडीआरएफचे निकष बाजूला करत मदत केली आहे. विरोधक कर्जमाफीबाबत बोलत आहेत, त्यासाठी आम्ही 32 हजार कोटी रुपये दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com