Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray addresses party MLAs during a crucial meeting, while Rahul Patil's absence becomes a talking point. sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 'या' आमदाराची दांडी; रणनीती ठरली!

Shivsena UBT Mla Rahul Patil : मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या बैठकीला वैयक्तिक अडचणीचे कारण सांगत एक आमदार गैरहजर होता.

Roshan More

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे सावध झाले आहेत. दरम्यान, आमदार सचिन अहिर यांनी देखील साथ सोडल्याने ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे 19 आणि विधान परिषदेतील पाच असा 24 आमदारांची बैठक बोलवली होती.

ही बैठक मंगळवारी ठाकरेंचे निवास्थान मातोश्रीवर पार पडली. मात्र, या बैठकीला एक आमदार गैरहजर राहिला असल्याचे समोर आले आहे. आमदार राहुल पाटील हे ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला आले नाहीत. त्यांनी आपल्या अनुपस्थितीविषयी पक्षाला कळवले होते, अशी माहिती समोर येत आहे.

वैयक्तिक अडचणीमुळे राहुल पाटील हे बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले की, राम मंदिर चोरी प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावागावांमध्ये सर्व जाती-धर्माच्या आणि सर्व पक्षांच्या, पंथांच्या लोकांना – ज्यांची प्रभू रामचंद्रांवर श्रद्धा आहे, हिंदुत्वावर श्रद्धा आहे, अशा सर्व जनतेला आणि भाविकांना सोबत घेऊन आंदोलन करावे आणि या चोरांना शिक्षा व्हावी, अशा पद्धतीचा विषय या बैठकीत मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चिंता नसावी सर्व ठीक ठाक...

उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर उपस्थित आमदारांचा फोटो शेअर करत म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आमदारांची बैठक संपन्न झाली! खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय घडामोडींवर चर्चा झाली! सर्व काही ठीक ठाक , उत्तम आहे, चिंता नसावी, जय महाराष्ट्र.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT