Uddhav Thackeray Eknath Shinde Balsaheb Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचा फोटो एकनाथ शिंदे का वापरू शकतात? उद्धव ठाकरेंनीच सांगून टाकलं

Roshan More

Uddhav Thackeray News : ते माझ्या बापाचा फोटो वापरतात. त्यांनी माझ्या बापाचा फोटो न वापरता निवडणूक लढावी, असे आव्हान उद्धव ठाकरे आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांना सतत देत असतात. मात्र, एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का वापरू शकतात, याचे उत्तर खुद्द उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमधील शिव संकल्प मेळाव्यात दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश मोदी सरकारने महापुरुषांच्या यादीत केला आहे. त्यामुळे त्यांचा फोटो वापरण्याचा सर्वांना अधिकार आहे. बाळासाहेबांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करतानाच शिवसेना फोडण्याचा डाव मोदींचा होता.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, यांनी शिवसेना फोडली. शरद पवारांचा पक्ष फोडला. शरद पवार असताना त्यांचा फोटो ते वापरत होते. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. आणि आपला फोटो वापरू नका, असे सांगितले. लोक म्हणतील बाळासाहेबांचा फोटो वापरू नये म्हणून तुम्ही का नाही न्यायालयात गेला. पण बाळासाहेबांचा समावेश महापुरुषांच्या यादीत केल्याने त्यांचा फोटो सर्व वापरू शकतात.

आरक्षणावर सर्वमान्य तोडगा काढा

मराठा, ओबीसी आरक्षणावरून OBC Reservation उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले. तुम्ही मनोज जरांगे, लक्ष्मण हाकेंच्या जीवाशी का खेळ करताय. जाती भेदाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वमान्य असा तोडगा काढा, त्याला माझा पाठिंबा असेल, असे ठाकरे म्हणाले.

बहि‍णींसाठी योजना भावांना काय?

उद्धव ठाकरे म्हणाले, बहि‍णींसाठी योजना घोषित केली. आमच्या त्याला विरोध नाही. पण बेरोजगार भावांसाठी काय? शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यायला हवी.मी मुख्यमंत्री असताना कोणी मागणी केली नव्हती. मात्र मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्याची अंमलबजावणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT