Mumbai News : राज्यातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. मंगळवारी झालेल्या या सुनावणीनंतर पुढील सुनावणी दोन आठ्वड्यानंतर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सुनावणी पार पडल्यानंतर या प्रकरणावर वकिलांनी मोठा दावा केला आहे. आगामी काळात राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत निर्णय सुप्रीम कोर्ट देईल, असा दावा शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी केला आहे. (Shivsena News)
या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात २१ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत आता काय होणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच याबाबत वकील असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
असीम सरोदे यांच्या मते शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी शिवसेना पक्षाचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल लावावा लागणार आहे. अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे दावा सरोदे यांनी केला आहे
असीम सरोदे यांच्या मते शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी शिवसेना पक्षाचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल लावावा लागणार आहे. अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे दावा सरोदे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यात होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल द्यावा लागणार आहे. येत्या काळात होत असलेल्या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळेल. तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल, असा मोठा दावा सरोदे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.