Santosh Deshmukh Case  sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : सीडीआरच्या डाटानुसार सुत्रधार वाल्मिक कराडच; उज्ज्वल निकम यांचा दावा

Ujjwal Nikam On Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (ता.26) दुसरी सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठोस पूरावे असल्याचे सांगत वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचे म्हटलं आहे.

Aslam Shanedivan

Beed News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (ता.26) सुनावणी पार पडली. दुसऱ्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हजेरी लावली. तसेच त्यांनी या प्रकरणात ठोस पूरावे असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचे म्हटलं आहे. ही सुनावणी सकाळी 11.30 वाजता सुरू झाली. सुनावणी झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात दुसऱ्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हजेरी लावली. त्यांच्या पहिल्याच सुनावणीत त्यांनी महत्वाचा पुरावा सादर करताना वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्याचा मुद्दा मांडला. तसेच पोलिसांच्या आरोपपत्रात असणारी पण चार्जशीटमध्ये नसणारी सीडीआरच्या मुद्द्यावरून देखील निकम यांनी उचलला.

याच सीडीआरच्या महत्त्वाचा मुद्द्यावरून कृष्णा आंधळे याने असताना विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला तीनवेळा फोन केल्याची माहिती न्यायालासमोर आणली. हाच सीडीआर देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचे थेट कनेक्शन समोर येत असल्याचा दावाही निकम यांनी न्यायालयात केला. त्यांच्या या युक्तिवादामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

यावेळी निकम यांनी आमच्याकडे प्रत्येक तारखेचा पुरावा असून ज्याने धमकी दिली आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दिली. तो तेथे गँगलीडर म्हणून आला होता. यावेळी सुदर्शन घुलेनेही धमकीचा पुनरुच्चार केला होता. याचे सर्व पुरावे व्हिडिओ आणि ऑडिओ रुपात आमच्याकडे आहेत. पण हे सर्व पुरावे न्यायालयाने गोपणीय ठेवावेत अशी मागणी केल्याचेही निकम यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांच्या प्राथमिक युक्तिवादानंतर ही सुनावणी संपली.

डॉक्युमेंट आणि चार्जशीट मागणी

निकम यांनी सर्व पुराव्यात वाल्मिक कराडचा हात असल्याचे दिसत असून हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार आहे, असे सांगितले यावर वाल्मिक कराडच्या वकिलांची विरोध केला. तसेच या प्रकरणाची ही दुसरी सुनावणी असून आज सरकारी वकिलांनी सगळी घटना सांगितली. पण या प्रकरणातील चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि कागदपत्रांची मागणी करूनही ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे देण्यात यावेळी अशी मागणी करण्यात आली. तसेच ही माहिती आम्हाला मिळणे हा आमचा अधिकार असून सर्व माहिती आम्हाला मिळ्यानंतरच ती चार्ज फ्रेम करावी विनंती आरोपीच्या वकीलांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT