Santosh Deshmukh Murder case : हत्येला 100 दिवस पूर्ण होताच धनंजय देशमुखांच्या 'टार्गेट'वर तपासयंत्रणा; म्हणाले, 'कृष्णा आंधळेचे...'

Dhananjay Deshmukh News : या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. नेमके त्या आरोपीचे काय झाले आहे? हे आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे, असा सवाल धनंजय देशमुख यांनी पोलीस यंत्रणेला केला आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला गुरुवारी 100 दिवस झाले आहेत. न्याय मिळण्यासाठी या शंभर दिवसांत देशमुख कुटुंबाला मोठा लढा उभारावा लागला. त्यानंतर या हत्या प्रकरणात पोलीस यंत्रणेकडून तपास करून आठ आरोपीना ताब्यात घेऊन मोक्कांतर्गत कारवाई केली. दुसरीकडे या हत्या प्रकरणाबाबत पोलिसांनी जवळजवळ 1500 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी सध्या कोर्टात सुरु आहे. परंतु या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. नेमके त्या आरोपीचे काय झाले आहे? हे आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे, असा सवाल धनंजय देशमुख यांनी पोलीस यंत्रणेला केला आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde : शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच; ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के...

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यातील वातावरण तापले होते. त्यामुळे जागोजागी या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात आले होते. त्यावेळी आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

Santosh Deshmukh Murder Case
Ajit Pawar : अजितदादा महिन्यात दुसऱ्यांदा नांदेडमध्ये येणार ! काँग्रेस नेते टेन्शनमध्ये; राजकीय घडामोडीना आला वेग

हत्येला शंभर दिवस झाल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, या काळात आम्हाला खूप मोठा त्रास सहन करावा लागला. कुटुंबात बसून दुःख व्यक्त करायला आम्हाला वेळ मिळाला नाही. न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले. या काळात सगळ्या जाती-धर्माच्या नागरिकांनी साथ दिली. अन्यथा आमच्या अडचणी वाढल्या असत्या. ज्या दिवशी आरोपींना फाशी होईल, तो दिवस न्यायाचा असणार आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Prashant Kortkar : प्रशांत कोरटकरच्या अडचणी आणखी वाढणार; पुरावा नष्ट केल्यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याची मागणी

पोलीस यंत्रणेने आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे की फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेचे काय झाले. आम्हाला देखील कृष्णा आंधळेबाबत स्पष्टीकरण हवे आहे. तो कुठे आहे ? तो का सापडत नाही?, हे पोलिसांनी सांगितले पाहिजे. त्याला लवकरात लवकर जेरबंद करून फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे. आरोपी शोधून काढण्यासाठी शंभर दिवसांचा कालावधी खूप मोठा आहे. या काळात एखादा आरोपी न सापडणे गंभीर प्रकार आहे. आता याबाबत काही भूमिका घ्यायची गरज पडली तर गावाच्या विचाराने घेऊ, असे धनंजय देशमुख म्हणाले.

Santosh Deshmukh Murder Case
BJP Politics : भाजप सरकारमध्ये मंत्री झाले, पण 5 वर्षांपूर्वीची केस पाठ सोडेना! पक्षावरही नामुष्की?

प्रत्येक आरोपींने चुकीच्या पद्धतीने हे हत्यासत्र घडवले. त्यामुळे न्यायाच्या भूमिकेत आम्ही रस्त्यावर उतरलो. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange), लोकप्रतिनिधी आणि समाजाचे सर्व घटक एकत्र आले. त्यानंतर कुठे गुन्हा दाखल झाला. आता आरोपींना फाशीची शिक्षा कधी होईल, हे येणाऱ्या काळात बघावे लागणार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

Santosh Deshmukh Murder Case
MLC Election : मोठी बातमी : विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद, आमदारकीचे स्वप्न भंगले

एका गोष्टीची खंत वाटते. या प्रकरणातील फरार असलेला एक आरोपी अजून ताब्यात आला नाही. हे शंभर दिवस आमच्यासाठी खूप दुःखद होते. ते दुःख विसरून आम्ही आमच्या वडिलांना न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलो, असे मत वैभवी देशमुख यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde : PM मोंदी अन् उद्धव ठाकरेंबाबत एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com