Devendra Fadnavis : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असतील, असे राऊत म्हणाले होते.
राऊतांच्या दाव्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या सर्व चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पूर्णविराम लावत ते दिल्ली जाणार की नाही, हे स्पष्ट केले आहे.
पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते दिल्ली जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याबाबत विचारले. तेंव्हा ते म्हणाले की, 'अनेकांना वाटतंय की मी दिल्लीत गेलं पाहिजे. पण त्या सगळ्यांना मी सांगतो की, मुंबईतच आहे.' दरम्यान, फडणवीसांच्या या उत्तराने ते दिल्लीत जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्रिमंडळाची विस्ताराची चर्चा सुरू असताना ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर, शिवसेनेला देखील दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. तर, दुसऱ्या मंत्रिपदासाठी रस्सीखेंच सुरू आहे. संजय जाधव आणि ओम राजेनिंबाळकर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल असे सांगितले जात आहे. तर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा देखील दावा मजबूत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे मंत्रिपद नको म्हणून राष्ट्रवादीकडून मंत्रिपद घेण्यात आले नव्हते. मात्र, आता नवीन विस्तारामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रफुल पटेल यांना मंत्रिपद मिळणार की पार्थ पवार यांना संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.