Union Cabinet Expansion 2026: दिल्लीत वेगवान घडामोडी! महाराष्ट्रातील बडा नेता अमित शाहांना भेटला; केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार संधी?

Amit Shah Meets Ujjwal Nikam: महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातून या नेत्याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Amit Shah Ujjwal Nikam Meeting
उज्ज्वल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलीSarkarnama
Published on
Updated on

Union Cabinet reshuffle Maharashtra leaders: संसदेतील पावसाळी अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तराकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे. विशेषतः काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

त्यामुळे यावेळेस शिवसनेच्या वाट्याला आणखी दोन मंत्रीपदे येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातून या नेत्याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दिल्लीत अधिवेशन सुरु असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार उज्जवल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना आता केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन या आठवड्यात संपणार आहे. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्ताराआधी झालेल्या या दोन नेत्याच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच उज्जवल निकम आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. ज्येष्ठ वकील असलेले निकम हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत.

त्यांच्याबाबत मुंबईहूनही चांगला अहवाल दिल्लीला पोहोचला आहे. त्यामुळे त्यांचे प्रमोशन होऊन त्यांच्यावर महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

Amit Shah Ujjwal Nikam Meeting
Union Cabinet Reshuffle : केंद्रात राघव चढ्ढा अन् शिवसेनेला मोठं बक्षिस मिळणार? अमित शहांनी राष्ट्रपतींची भेट घेताच ठरला मंत्रिमंडळातील फेरबदलाचा दिवस

उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील आहेत. हत्या, दहशतवाद आणि इतर गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Amit Shah Ujjwal Nikam Meeting
Union Cabinet Expansion: दिल्लीत शिंदेंचा मोठा गेम प्लॅन! शिवसेनेच्या कोट्यातील 2 मंत्रीपदांसाठी 'हे' 5 दिग्गज शर्यतीत; सस्पेन्स वाढला, कोणाला मिळणार संधी?

त्यानंतर 2025 मध्ये त्यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. आता त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वांचे आता त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com