Nitin Gadkari Sarkarnama
महाराष्ट्र

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री गडकरींनी नवा आदर्श घालत पुन्हा एकदा मन जिंकलं; आगामी महाराष्ट्र दौरा बसनं करणार

Modi Government Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करतानाच पेट्रोल-डिझेल दरवाढ यांमध्ये काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला महाराष्ट्रासह भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: मोदी सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 'हायवे मॅन ऑफ इंडिया' असं म्हटलं जातं. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात देशभत महामार्ग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत सातत्यानं धडाकेबाज निर्णयांचा धडाका लावल्याचं दिसून येतं. आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करतानाच पेट्रोल-डिझेल दरवाढ यांमध्ये काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला महाराष्ट्रासह भाजपची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा आगामी महाराष्ट्र दौरा बसने करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाद्वारे त्यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्याबाबत महत्त्वाची अपडेट दिले आहेत. त्यांनी त्यांचा हा महाराष्ट्र दौरा बसने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या चक्क 50 टक्क्यांनी कमी होणार असल्याचं समोर येत आहे.

केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी हे येत्या 14 आणि 15 मे 2026 रोजी पुणे,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग प्रकल्पांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा या दौऱ्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच आता पालखी महामार्ग प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मंत्री गडकरीच रस्त्यावर उतरणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे या या दौऱ्यात केवळ मंत्रीच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण सुरक्षा कर्मचारी,मंत्रालयाचा स्टाफ आणि निमंत्रित पत्रकार देखील एकाच बसमधून प्रवास करणार आहेत. त्यामुळे मंत्र्‍यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी कमी होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयानं या दौऱ्यासंबंधित पुणे,सातारा आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनाही पत्र लिहिलं आहे. या पत्रात गडकरी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याची विनंती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT