PM Modi Appeal: पंतप्रधान मोदींचं आवाहन मनावर घेतलं, उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्री, नेतेमंडळींना दिले महत्त्वाचे आदेश

Deputy CM Eknath Shinde Reply to PM's Narendra Modi Appeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसह सोने खरेदी टाळावी,तसेच परदेश दौरे रद्द कमी करण्याविषयी रविवारी(ता.13) देशवासियांना आवाहन केलं होतं. पण पंतप्रधान मोदी यांच्या याच आवाहनाला सत्ताधारी पक्षांकडून मोठा पाठिंबा मिळत असतानाच विरोधकांकडून त्याविरोधात जोरदार हल्लाबोल सुरू केलेला आहे
Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Eknath Shinde, Amit Shah, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसह सोने खरेदी टाळावी,तसेच परदेश दौरे रद्द कमी करण्याविषयी रविवारी(ता.13) देशवासियांना आवाहन केलं होतं. पण पंतप्रधान मोदी यांच्या याच आवाहनाला सत्ताधारी पक्षांकडून मोठा पाठिंबा मिळत असतानाच विरोधकांकडून त्याविरोधात जोरदार हल्लाबोल सुरू केलेला आहे.याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्या मंत्री,नेतेंमंडळींसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी(ता.13)माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी स्वत: इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास सुरू केलेला आहे. तसेच माझ्या ताफ्यामध्ये सुरक्षेविषयक ज्या काही गाडी असतील,तेवढ्याच कायम राहतील. अनावश्यक सर्व गाड्या ताफ्यामधून कमी करण्यात येणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही आवाहन केलं आहे, ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. सत्ताधारी असेल किंवा विरोधक या सर्वांनी एकत्र येऊन युद्धजन्य परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे,असं मतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.

पंतप्रधानांनी जे काही काटकसरीचं आवाहन केलेलं आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर कमी झाला पाहिजे. आपले जे डॉलर त्यावर खर्च होतात, आपण क्रुड ऑईल जे काही मोठ्या प्रमाणात आयात केलं जातं. त्यामुळे काटकसर करुन त्याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे,असं आवाहन मोदींजींनी केलं. मी स्वत:तसेच प्रत्येक भारतीयानं हे स्वीकारलं पाहिजे, कारण हे देशहितासाठीच असल्याचंही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
Narendra Modi appeal: पीएम मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक; मंत्रालयात वेगवान घडामोडी; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

देशहित सर्वतोपरी असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कायमच नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मी स्वत: इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केलेला आहे. याच वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा इरादाही शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.

आपल्या देशातील नागरिकांना या युध्दाचा कमीत कमी फटका बसला पाहिजे, या हेतूनेच हे आवाहन केलेलं आहे. म्हणून राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विरोधी पक्षांनी ठरवलं पाहिजे,असा टोलाही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

आपल्या देशातील नागरिकांना या युध्दाचा कमीत कमी फटका बसला पाहिजे, या हेतूनेच हे आवाहन केलेलं आहे. म्हणून राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विरोधी पक्षांनी ठरवलं पाहिजे, असा टोलाही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi
एका-एका मतासाठी झगडले, राज्यपालांनी 3 वेळा परत पाठवलं : आता विधानसभेत 'विजय' यांच्या मागे सिद्ध झालं 'तगडं' बहुमत

विरोधकांकडून पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्त देताना शिंदे म्हणाले,सत्ताधारी आणि विरोधकांनी देशहिताच्या विषयावर एकत्र उभं राहणं गरजेचं असून जनतेला हे मान्य नसून 140 कोटी भारतीय मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com